शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कचरा टाकणारे पर्यटक गोव्याला नकोत: पर्यटनमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 20:20 IST

किना-यांवर नशा करून हैदोस घालणारे व कचरा टाकणारे पर्यटक गोव्याला नको आहेत, असे पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी विधानसभेत सांगितले.

पणजी:  किना-यांवर नशा करून हैदोस घालणारे व कचरा टाकणारे पर्यटक गोव्याला नको आहेत, असे पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी विधानसभेत सांगितले. अशा पर्यटकांवर कारवाई करण्यासाठी सरकारने पूर्ण तयारी केली असल्याचे त्यांनी सांगितले. दारू व ड्रग्सचा नशा करणारे, तसेच बाटल्या वगैरे फोडून इतरांना उपद्रव  करणारे पर्यटक गोव्याला नकोच आहेत. अशा पर्यटकांवर कारवाई करण्यासाठी सर्व यंत्रणे सज्ज करण्यात आली आहेत. तसेच सुरक्षा यंत्रणांना योग्य आदेश देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.वेळ्ळीचे आमदार फिलीप नेरी रॉड्रिगीश यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. समुद्र किना-यावर मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था असतानाही कचरा कसा टाकला जातो. भारतीय राखीव दळाचे पोलीस, किनारा पोलीस,शिवाय दृष्टीचे कर्मचारी व इतर सुरक्षा असतानाही किना-यांवर कचरा टाकण्याचे प्रकार कसे होतात. भिकारी व लोकांना उपद्रव करणारे किना-यांवर कसे फिरू शकतात असा त्यांचा प्रश्न होता. कारण पर्यटन हंगाम सुरू झाल्यापासून अशा लोकांकडून लोकांना उपद्रव करण्याच्या ५०० घटना नोंद झाल्या आहेत त्याचा त्यांनी उल्लेख केला. त्यावर उत्तर देताना पर्यटनमंत्री आजगावकर यांनी कारवाई केली तरी हे लोक पुन्हा किनाºयावर येतातच. तसेच कचरा टाकणा-यांवरही कारवाई सुरू असल्याचे क्यांनी सांगितले. आता कडक कारवाई करणार्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यात आली आहे. गोव्याचे माव बदनाम करणारे असले पर्यटक गोव्याला नकोच आहेत असे त्यांनी सांगितले.