शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

यंदा पहिल्यांदाच भाजपचे उमेदवार संघटनेच्या पाठबळाविना!

By admin | Updated: January 8, 2017 01:37 IST

पणजी सुभाष वेलिंगकरांच्या नेतृत्वाखालील रा. स्व. संघाचा एक संपूर्ण घटक वेगळा होऊन

पणजी सुभाष वेलिंगकरांच्या नेतृत्वाखालील रा. स्व. संघाचा एक संपूर्ण घटक वेगळा होऊन प्रखर विरोधक म्हणून उभा ठाकल्याने या वेळी पहिल्यांदाच भाजप उमेदवारांना संघटित बळाशिवाय स्वबळावर काम करावे लागणार आहे. भारतीय भाषा सुरक्षा मंच व गोवा सुरक्षा मंच यांनी बहुसंख्य मतदारसंघांत भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उभी फूट पाडल्यामुळे भाजप संघटनेत अस्वस्थता आणि धाकधूक निर्माण झाली आहे. खात्रीशीर उमेदवारही धोक्याच्या रेषेबाहेर गेले आहेत. ‘‘संघाने फारकत घेतल्यामुळे भाजप संघटनेत जीव ओतून काम करणारा घटक राहिला नाही. त्यात वेलिंगकरांसारखी शक्ती विरोधात गेली व तिने पर्रीकरांना टीकेचे लक्ष्य बनविले हा कार्यकर्त्यांच्या मनावर एक मोठा आघात आहे,’’ अशी प्रतिक्रिया संघ आणि भाजप संघटनेत काम केलेल्या एका जबाबदार कार्यकर्त्याने व्यक्त केली. संघ जरी भाजपमध्ये प्रत्यक्षरीत्या काम करीत नसला तरी निवडणुकीच्या काळात या दोन्ही संघटना मिळून मिसळून कार्य करीत. भाजपच्या प्रत्येक निवडणूक समितीत महत्त्वपूर्ण जबाबदारी संघाच्या कार्यकर्त्याकडे असे. या निवडणुकीत ती उणीव जबरदस्तरीत्या जाणवणार आहे, असे हा कार्यकर्ता म्हणाला. याचा अर्थ भाजपकडे स्वत:ची संघटना नाही असे नाही; परंतु हे बहुसंख्य कार्यकर्ते एक तर उमेदवाराचे किंवा नेत्यांचे निष्ठावान आहेत. त्यांच्यात तळमळीचा अभाव असतो. भाजपने संघाच्याच सहकार्याने गेल्या ३० वर्षांत पक्षसंघटना बांधली. ही संघटना संघाच्याच धर्तीवर उभारली गेलीय. त्यात नेत्याचे आदेश मानण्याची प्रथा आहे. सतीश धोंड गोव्यात असेतोवर त्यांनी ती अत्यंत बांधेसूद राहील याची खबरदारी घेतली. २०१२च्या निवडणुकीनंतर तिला तडे जाऊ लागले व पर्रीकर दिल्लीला गेल्यानंतर ती आणखी विस्कळीत बनली. पर्रीकर आणि धोंड ही जोडगोळी संघटनेत आणि सरकारात समन्वय आणि शिस्त निर्माण करण्यावर भर देत असे. शिवाय धोंड गोव्यात असेतोवर मंत्रिमंडळ संघटनेला डोईजड होणार नाही हे कटाक्षाने पाहात असत. परंतु वेलिंगकरांचा सवतासुभा आणि मुख्यमंत्री पार्सेकर यांच्याकडून पक्षसंघटना बळकट बनविण्यासाठी लागणाऱ्या प्रयत्नांचा अभाव, शिवाय शेवटच्या कार्यकर्त्याकडे जाण्याची दत्ता खोलकर आदींची असमर्थता यामुळे वेलिंगकरांचा प्रभाव वाढत गेला, त्या तुलनेने भाजप संघटनेचे बळ वाढू शकले नाही. सतीश धोंड यांच्यानंतर संघटना तल्लख बनविणारा दुसरा सक्षम संघटक पक्षाला मिळू शकला नाही, हे सुद्धा वास्तव आहे. सूत्रांनी सांगितले, की तिकिटे प्राप्त करण्यासाठी उमेदवारांनी केलेले शक्तिप्रदर्शन, काही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांच्या ओंगळवाण्या प्रतिक्रिया व शिवीगाळ, भाजपमधील बंडखोरी व मगोपच्या कळपात सामील होण्याचे प्रकार हे संघटना ढेपाळल्याचे लक्षण मानले जाते. यापूर्वी काँग्रेसमध्ये असे प्रकार चालत; कारण त्या पक्षात संघटना नावाला अस्तित्वात आहे. राजकीय निरीक्षकांच्या मते, कोणताही पक्ष सत्तेवर येतो, तेव्हा वेगवेगळे हितसंबंध जोपासणारे घटक पक्षात येतात. ते काम करतात आणि त्यानंतर आपल्या महत्त्वाकांक्षा व्यक्त करताना लाजत नाहीत. पर्रीकरांनीही काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना प्रवेश देताना पक्ष मोठा बनविण्यासाठी ही आयात महत्त्वाची असल्याचे मत व्यक्त केले आहे; परंतु याच नेत्यांना दिगंबर कामत भाजपमधून फुटले तेव्हा मोठा मानसिक धक्का बसला होता व ते शल्य पर्रीकर अजून बाळगून असतात. त्याच धक्क्याचा सामना करताना पक्षाने यापुढे उमेदवाऱ्या मूळ भाजपवाल्यांनाच देण्याचे तत्त्व निश्चित केले होते. दुर्दैवाने १० वर्षांतच तत्त्वाला मुरड घालावी लागली असून सत्ता हेच ध्येय मानलेल्या नेत्यांच्या कार्यपद्धतीला संघातून कडवा विरोध झाला व त्यातून संघटना विस्कळीत होण्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे. परंतु निरीक्षक असेही मानतात की भाजपचे केडर आता तयार झाले आहे आणि कितीही मोठे संकट येवो, ते भाजपबरोबरच राहाणार आहे.