शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

तिळारी-आमठाणे जलवाहिनी

By admin | Updated: August 5, 2014 01:48 IST

पणजी : वारंवार फुटणाऱ्या कालव्यांमुळे तिळारी धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात व्यत्यय येतो. त्यावर मात करण्यासाठी तिळारी-आमठाणे जलवाहिनी

पणजी : वारंवार फुटणाऱ्या कालव्यांमुळे तिळारी धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात व्यत्यय येतो. त्यावर मात करण्यासाठी तिळारी-आमठाणे जलवाहिनी टाकण्याची घोषणा विधानसभेत सोमवारी करण्यात आली. त्यामुळे उत्तर गोव्यात उन्हाळ्यात जाणवणाऱ्या पाणी टंचाईच्या झळा कमी होतील. शेतीसाठी कालव्यांद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. तिळारी महामंडळाचा गाशा गुंडाळण्यात येणार असून पुढील काळात जलस्रोत खातेच जलवाहिनी टाकण्यासह इतर कामे करणार असल्याचे खात्याचे मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी स्पष्ट केले. खात्याच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना मांद्रेकर म्हणाले की, दोन दिवसांपूर्वीच उभय राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची वरील जलवाहिनी, तसेच तिळारी विस्थापितांच्या बाबतीत चर्चा झालेली आहे. म्हादईचे पाणी कोणत्याही परिस्थितीत वळवू न देण्याबाबत सरकार ठाम आहे आणि त्याबाबत कर्नाटकची मुळीच गय केली जाणार नाही. आमदार विष्णू वाघ यांनी हरवळे धबधब्यात एका कारखान्याचे सांडपाणी सोडले जात असल्याने धबधब्याचे पाणी दूषित झाले आहे, याकडे लक्ष वेधून संबंधित कंपनीवर कारवाईची मागणी केली. आमदार किरण कांदोळकर यांनी तिळारीच्या बांधकामात ज्यांनी घोटाळा केला, त्यांची चौकशी करावी, अशी मागणी केली. तिळारी महामंडळ बंद करून खात्याने कामे हाती घ्यावीत, असे त्यांनी सुचविले. कालव्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने थिवी, सिरसई भागात शेतामध्ये पाणी येऊन पीक नष्ट होते, असे ते म्हणाले. आमदार नरेश सावळ यांनी तिळारी कालव्याचे पाणी शेतात शिरते व त्यामुळे पिकांचे नुकसान होते, याकडे लक्ष वेधले. आपत्ती व्यवस्थापनाला सोबत घेऊन जलस्रोत खात्याने कामे कारायला हवीत, असे त्यांनी सुचविले. आमदार विजय सरदेसाई यांनी कोमुनिदादकडून येणाऱ्या अडचणींमुळे नाल्यांमधील गाळ उपसण्याचे काम अडते, याकडे लक्ष वेधले. फातोर्डा येथे सांडपाणी वाहिनी फुटून विहिरी दूषित झाल्या आहेत, हे त्यांनी निदर्शनास आणले. आमदार रोहन खंवटे यांनी पर्वरीत रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाची मागणी केली. अनेक अन्य आमदारांनी नाल्यांच्या साफसफाईचा प्रश्न उपस्थित केला. (प्रतिनिधी)