शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वाघ यांची प्रकृती स्थिर

By admin | Updated: August 20, 2016 02:24 IST

पणजी/मुंबई : भाजपचे आमदार व साहित्यिक विष्णू वाघ यांच्यावर माहिम-मुंबई येथील हिंदुजा इस्पितळामध्ये उपचार सुरू आहेत

पणजी/मुंबई : भाजपचे आमदार व साहित्यिक विष्णू वाघ यांच्यावर माहिम-मुंबई येथील हिंदुजा इस्पितळामध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे कला अकादमीचे उपाध्यक्ष सुशांत खेडेकर यांनी मुंबईहून जाहीर केले. डॉ. हेगडे यांच्यासह डॉ. पी. पी. अशोक (न्यूरो) आणि डॉ. घनश्याम काणे (कार्डियाक) या तीन डॉक्टरांचे पथक वाघ यांच्यावर उपचार करत आहे. न्यूरो सर्जन डॉ. रामाणी यांनीही हिंदुजा इस्पितळास भेट दिली व वाघ यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा केली. लोकांनी उगाच वाघ यांच्याविषयी कसल्याही अफवा पसरवू नयेत, असे आवाहन खेडेकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे. दरम्यान, विष्णू वाघ यांच्याकडून उपचारांना किती प्रतिसाद मिळतो ते कळण्यासाठी २४ तास थांबावे लागेल, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांना सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले की, आपण दर तीन-चार तासांनी संबंधितांकडे विचारपूस करून माहिती जाणून घेत आहे. सूत्रांनी सांगितले की, वाघ हे अद्याप व्हेन्टीलेटरवर असून त्यांचा मेंदू कार्यान्वित व्हावा म्हणून डॉक्टर प्रयत्न करत आहेत. बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळातून गुरुवारी रात्री वाघ यांना मुंबईच्या इस्पितळात हलविण्यात आले. वाघ हे गोमेकॉतही चार दिवस व्हेन्टीलेटरवरच होते. त्यांना प्रथम गेल्या मे महिन्यात हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर चार दिवसांपूर्वी गोमेकॉतच त्यांना रक्तदाब वाढून हृदयविकाराचा धक्का बसला होता. त्यांचे हृदय प्रथम आठ मिनिटे बंद पडले होते; पण नंतर ते पूर्ववत झाले होते. (खास प्रतिनिधी)