पणजी : उपसभापतीपदासाठी भाजपतर्फे सांत आंद्रेचे आमदार विष्णू वाघ, तर काँग्रेसतर्फे कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर यांनी उमेदवारी सादर केली आहे. काँग्रेस विधीमंडळ पक्षाने आमदार माविन गुदिन्हो यांना नजरेसमोर ठेवून व्हिप जारी केला आहे. बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास झाल्यानंतर गोव्याचे माजी राज्यपाल जेकब यांना श्रद्धांजली वाहिली जाईल. त्यानंतर उपसभापतीपदासाठी निवडणूक होणार आहे. वाघ यांनी उपसभापतीपदासाठी उमेदवारी सादर केली. सूचक व अनुमोदक म्हणून आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर, मंत्री दीपक ढवळीकर, आमदार बेंजामिन सिल्वा आदींनी सह्या केल्या आहेत. काँग्रेसने आमदार मडकईकर यांना रिंगणात उतरविले आहे. आमदार दिगंबर कामत, विश्वजीत राणे, अपक्ष आमदार विजय सरदेसाई आदींनी सूचक व अनुमोदक म्हणून पाठिंबा दिला आहे.
उपसभापतीपदासाठी वाघ-मडकईकर लढत
By admin | Updated: January 14, 2016 03:03 IST