शहरं
Join us  
Trending Stories
1
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
2
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
3
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
4
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
5
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
6
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
7
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
8
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
9
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
10
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
11
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
12
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
13
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
14
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
15
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
16
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
17
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
18
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
19
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
20
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

सिलिंडरच्या भडक्यात तिघे जखमी

By admin | Updated: January 30, 2015 01:26 IST

ओरल-असोळणा येथील दुर्घटना : आग विझविण्यासाठी गेले असता इजा

मडगाव : ओरल-असोळणा येथे एका घराच्या व्हरांड्याला लागलेली आग विझविण्यासाठी गेले असता घरगुती गॅसचा स्फोट झाल्याने तिघेजण जखमी झाले. या आगीत दोन दुचाकी जळून खाक झाल्या असून पाच लाखांची हानी झाली आहे. मडगाव अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणताना दहा लाखांची मालमत्ता वाचवली. गुरुवारी सकाळी ११.३0 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेत जुझे कार्दिन्हो (वय ५३), जेरी फर्नांडिस, फ्रान्सिस रॉड्रिगीस हे तिघे जखमी झाले. जुझे याला तातडीने मडगावच्या हॉस्पिसियोत दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याने उपचारासाठी त्याला गोमेकॉत दाखल केले आहे, तर या घटनेत जेरी व फ्रान्सिस हे किरकोळ जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अग्निशामक दलाच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीप्रमाणे, ओरल येथे सुभाष केरकर यांच्या घरात ही घटना घडली. सुभाष केरकर व महादेव केरकर या दोघा भावांचे घर एकमेकांना जोडून आहे. आगीची घटना घडली तेव्हा केरकर यांचे घर बंद होते. प्रथमदर्शनी मिळालेल्या माहितीनुसार, केरकर कुटुंबीय नेहमी घरासमोर असलेल्या व्हरांड्यात दिवा पेटवून ठेवत असत. हा दिवा खाली पडल्याने आग लागली व ती विझविण्यासाठी जुझे व जेरी हे दोघेही शेजारी गेले असता, व्हरांड्यातच ठेवलेल्या घरगुती गॅस सिलिंडरने पेट घेऊन त्याचा भडका उडाल्याने दोघेही जखमी झाले. या भागातील काही लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीने पेट घेतल्याने ती आग विझविण्यासाठी गेले असता, गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर कुंकळ्ळी पोलिसांनीही तेथे धाव घेतली. आगीची घटना म्हणून या प्रकरणाची पोलिसांनी नोंद केली आहे. जुझे परदेशात जहाजावर कामाला असून दोन दिवसांनंतर तो कामावर जाणार होता. (प्रतिनिधी)