शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

दूधसागर नदीत बुडून तीन मुलांचा मृत्यू

By admin | Updated: April 26, 2015 01:36 IST

कुळे : येथील गणेश मंदिराच्या मागील बाजूस दूधसागर नदीत आंघोळीसाठी उतरलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला.

कुळे : येथील गणेश मंदिराच्या मागील बाजूस दूधसागर नदीत आंघोळीसाठी उतरलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला. ऋतिक शिवाप्पा नंदकिरे (वय १४, रा. कर्नाटक), मेहक बसवराज कंडुगेली (वय १२) व मंतेश बसवराज कुंडुगेली (वय ६, दोघेही रा. मुंबई) अशी त्यांची नावे आहेत. शनिवारी दुपारी १२.३0 वाजता ही घटना घडली. दुर्दैव म्हणजे या मुलांच्या माता त्याच ठिकाणी कपडे धूत होत्या. मात्र, डोहात बुडणाऱ्या मुलांकडे पाठ असल्याने ती बुडाल्याचे त्यांच्या लक्षातच आले नाही. जेव्हा त्यांना मुलांचा आवाज येत नाही असे लक्षात आले, तोपर्यंत उशीर झाला होता.कुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, काशिबाई शिवाप्पा नंदकिरे ही आपला मुलगा ऋतिकसमवेत कर्नाटकहून, तर मंगला बसवराज कंडुगेली ही आपली मुले मेहक व मंतेश यांच्यासमवेत मुंबईहून कुळेला आपल्या माहेरी सुट्टीनिमित्त आल्या होत्या. काशिबाई नंदकिरे व मंगला कंडुगेली या सख्ख्या बहिणी शुक्रवारीच कुळे येथे आल्या होत्या. शनिवारी बारा वाजण्याच्या सुमारास दोघी बहिणी तीन बालकांसह नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्या कपडे धूत असताना मुले पाण्यात आंघोळीसाठी उतरली. ती ज्या ठिकाणी उतरली, त्या ठिकाणी खोल डोह होता. (पान २ वर)