शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' सहा इंडोनेशियन महिलांविषयी फेरविचार करा - पणजी खंडपीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 22:45 IST

व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी देश सोडण्याचा आदेश दिलेल्या सहा इंडोनेशियन महिलांना मुंबई उच्च न्यायायाच्या पणजी खंडपीठाने दिलासा देताना या प्रकरणाचा फेरविचार करण्याचा आदेश गोवा पोलिसांच्या विदेशी नागरीक नोंदणी विभागाला दिला आहे. 

पणजी:  व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी देश सोडण्याचा आदेश दिलेल्या सहा इंडोनेशियन महिलांना मुंबई उच्च न्यायायाच्या पणजी खंडपीठाने दिलासा देताना या प्रकरणाचा फेरविचार करण्याचा आदेश गोवा पोलिसांच्या विदेशी नागरीक नोंदणी विभागाला दिला आहे. गोव्यात वैद्यकीय कंपनीत प्रशिक्षक म्हणून नोकरीसाठी व्हिसा घेवून आलेल्या ६ इंडोनेशियाच्या महिलांना गोवा पोलिसांच्या विदेश विभागाने देश सोडण्यासाठी नोटीस बजावली होती. व्हिसाचे नियम या महिलांकडून उल्लंघन करण्यात आल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या महिलांकडून त्यांच्या गोव़्यातील वास्तव्याची माहिती कायद्यानुसार १४ दिवसांत विदेश विभागाला देणे आवश्यक होती. परंतु त्यांनी तसे केले नाही.  या शिवाय या महिला वैद्यकीय कंपनीत काम करण्याच्या कंत्राटावर आल्या होत्या, परंतु त्या स्पामध्ये मसाज करण्याचे काम करीत होत्या, असे आढळून आले आहे. हेही व्हिसा नियमांचे उल्लंघन ठरते. त्यामुळे त्यांना विदेश विभागाने देश सोडण्यास सांगितले होते. विदेश विभागाच्या आदेशानंतर या सहा महिलांनी खंडपीठात धाव घेतली होती. खंडपीठात सादर केलेल्या याचिकेत त्या महिलांनी आपली चूकही मान्य केली आहे, परंतु विदेश विभागासमोर स्पष्टीकरण देण्याची संधी देण्याची आणि या विभागाला आपल्या निर्णयाच्या बाबत फेर विचार करण्याची मागणी याचिकेत केली होती. न्यायमूर्ती एन एम जामदार व पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने त्यांना दिलासा देताना विदेश विभागाला या प्रकरणात पुन्हा एकदा सुनावणी घेऊन काय तो निर्णय घेण्याचा आदेश दिला आहे.

टॅग्स :goaगोवा