शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

साखळी भागात चोरट्यांचा धुडगूस

By admin | Updated: August 8, 2014 02:26 IST

डिचोली : साखळी भागात चोरट्यांच्या टोळीने डिचोली पोलिसांच्या नाकावर टिच्चून दत्तवाडी-साखळी येथील तीन दुकाने व न्हावेली येथील लक्ष्मीनारायण

डिचोली : साखळी भागात चोरट्यांच्या टोळीने डिचोली पोलिसांच्या नाकावर टिच्चून दत्तवाडी-साखळी येथील तीन दुकाने व न्हावेली येथील लक्ष्मीनारायण देवस्थानमधून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. यामुळे डिचोली पोलिसांसमोर तपासासाठी मोठे आव्हान उभे राहिले आहे. डिचोली पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, न्हावेली येथे मुख्य रस्त्याला लागूनच असलेल्या लक्ष्मीनारायण मंदिराचे डाव्या बाजूचे दार तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला व गर्भगृहातील चांदीची प्रभावळ, एक फुल व मुखवटा आणि फंडपेटीतील सुमारे पाच हजार रोख मिळून सुमारे ३ लाख ५५ हजारांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी भरोणीवाडा-न्हावेली येथील सच्चिदानंद काशिनाथ गावस यांनी तक्रार केली आहे. चोरट्यांनी मंदिरातील फंडपेटी मंदिरासमोर टाकली होती. दत्तवाडी-साखळी येथे भर लोकवस्तीत एका रहिवासी इमारतीत चोरट्यांनी तीन दुकानांना आपले लक्ष्य बनविले. या इमारतीत असलेल्या रोहन एंटरप्रायझेस या इलेक्ट्रॉनिक दुकान, गणेश जनरल स्टोअर व फोटोग्राफी या दुकानांमध्ये चोरी केली. चोरट्यांनी अत्यंत अभ्यासपूर्वक चोरी केल्याचे चोरीची पद्धत पाहता निदर्शनास आले. गणेश जनरल स्टोअर हे मध्यभागी असून त्याच्या डाव्या बाजूला इलेक्ट्रॉनिक, तर उजव्या बाजूला फोटोग्राफी दुकान आहे. चोरट्यांनी गणेश जनरल स्टोअरच्या मागील बाजूस असलेल्या शौचालयाच्या खिडकीचे रॉड तोडून आत प्रवेश केला. जनरल स्टोअरमध्ये असलेले दार फोडून उजव्या बाजूला असलेल्या फोटोग्राफी दुकानात प्रवेश करत तेथील सुमारे दोन हजार रोख ताब्यात घेतले. नंतर त्यांनी गणेश जनरल स्टोअरच्या पहिल्या मजल्यावर जात दुकानाच्या दर्शनी वरील भागात असलेल्या खिडकीचे ग्रील्स तोडले व बाहेर येत बाजूला असलेल्या रोहन एंटरप्रायझेस या दुकानाचे वरील ग्रील्स तोडून आत प्रवेश केला. या दुकानातील एलईडी टीव्ही व सुमारे सहा हजार रोख रुपये लंपास केले. नेमके किती एलईडी टीव्ही चोरीस गेले त्याचा अंदाज न मिळाल्याने चोरीच्या रकमेचा आकडा समजू शकला नाही. डिचोलीचे पोलीस उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई यांनी दोन्ही ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी निरीक्षक रूपेंद्र शेटगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विठ्ठल माजीक अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)