शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात पर्यटकांना लुबाडऱ्यांची गय नाही, मुख्यमंत्री प्रमोद सावंत कडाडले

By किशोर कुबल | Updated: December 19, 2022 15:38 IST

मुक्तीदिनानिमित्त ताळगांव येथे गोवा विद्यापीठ मैदानावर आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात सावंत बोलत होते.

पणजी : गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची लुबाडणूक करणाऱ्यांची मुळीच गय केली जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिला आहे. ‘पाहुण्यांना उत्तम प्रकारची वाहतूक सेवा टॅक्सी व्यावसायिक तसेच टूर आॅपरेटर्सनी सरकारला सहकार्य करावे. टॅक्सीभाड्यापासून विमान भाड्यापर्यंत सर्वच गोष्टींवर नियंत्रण हवे. टॅक्सीवाल्यांची कोणतीही बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही,’ असे मुख्यमंत्र्यांनी ठणकावले.

मुक्तीदिनानिमित्त ताळगांव येथे गोवा विद्यापीठ मैदानावर आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात सावंत बोलत होते. याप्रसंगी सभापती रमेश तवडकर, महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात, विरोधी पक्षनेते युरी आलेमांव, हायकोर्ट न्यायाधीश व इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.

 मुरगांव बंदरात गेल्याच आठवड्यात अमेरिकन पर्यटकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न झाला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी वरील इशारा दिला. ते म्हणाले की,‘ टॅक्सीभाड्यापासून विमान भाड्यापर्यत सर्वच गोष्टींवर नियंत्रण यायला हवे. गोव्याला नंबर वन पर्यटनस्थळ अशी प्रतिमा कायम राखायची असेल तर हे आवश्यक आहे. पर्यटकांची लूट थांबायला हवी.’मुख्यमंत्री म्हणाले की,‘ गोव्याची पर्यटनाबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यासाठी तसेच किनाऱ्यांबरोबरच राज्याच्या अंतर्गत भागातील पर्यटन (हिंटरलँड टुरिझम), इको-टुरिझम, वेलनेस टुरिझम, आध्यात्मिक पर्यटन यांसारख्या पर्यटनाच्या विविध पैलूंसाठी सरकार प्रयत्नरत आहे.’राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून शुभेच्छाराष्ट्रपती दौपदी मुर्मू यांनीही मुक्तिदिनानिमित्त गोमंतकीय जनतेला शुभेच्छा देताना पोर्तुगीजांच्या जोखडातून गोवा मुक्त करण्यासाठी लढा दिलेले स्वातंत्र्यसैनिक तसेच भारतीय सैन्यदलाचे स्मरण केले आहे. या सर्वांना सलाम, असे त्यांनी म्हटले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा मुक्तिदिनानिमित्त गोमंतकीय जनतेला शुभेच्छा दिल्या असून गोवा मुक्तीलढ्यासाठी योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिक, हुतात्म्यांचे स्मरण केले आहे. ‘या सर्वांचे योगदान स्फूर्तीदायी आहे. त्यांच्या दूरदृष्टीने प्रेरित होऊन गोव्याच्या विकासासाठी आम्ही कार्यरत आहोत,’असे मोदीजींनी म्हटले आहे.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतtourismपर्यटन