शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

एक होती अखिल भारतीय विद्यार्थी परिषद

By admin | Updated: September 20, 2014 01:20 IST

राज्यातील वास्तव : भाजप विद्यार्थी प्रकोष्ठचे विद्यापीठावर वर्चस्व

वासुदेव पागी-पणजी : राज्यात ‘विद्यार्थी चळवळ’ :हा विषय आला की, एक नाव न चुकता प्रामुख्याने घ्यावे लागेल ते म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद. काही दशके आंदोलने आणि चळवळींनी इतिहास बनविलेल्या या संघटनेचे नाव आजच्या घटकेला निदान गोवा विद्यापीठाच्या क्षितिजावरून तरी नाहीसे झाले आहे. राष्ट्रीयत्व ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा घेऊन विद्यार्थी क्षेत्रात सक्रिय असलेल्या ‘अभाविप’ने १९९० ते २००८ या काळात राज्यभर दबदबा निर्माण केला होता. गोवा विद्यापीठाच्या विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकीत कित्येक वेळा या संघटनेचा झेंडा फडकला होता. अशा या संघटनेचा आज राज्यातील एकाही महाविद्यालयात विद्यापीठ प्रतिनिधी नाही, ही वस्तुस्थिती आहे. हल्लीच झालेल्या ‘अभाविप’च्या गोव्यातील पीछेहाटीचे कारण विचारले असता, ‘अभाविप’चे एकेकाळी प्रदेशमंत्री म्हणून जबाबदारी असलेले लालजी पागी यांनी सांगितले की, संघटना पूर्वीसारखी गोव्यात सक्रिय नाही हे खरे आहे; परंतु त्यामुळे संघटनेचे काम थांबले, असे म्हणता येणार नाही. संघटनेचे काम सुरू असल्याचे ते सांगतात. केवळ विद्यापीठ निवडणुका हे संघटनेचे एकमेव उद्दिष्ट कधीच नव्हते. परिषदेच्या कामासाठी गोव्यात येणारे प्रचारक येणे बंद झाल्यामुळे कामाला मरगळ आल्याची प्रतिक्रिया परिषदेच्या एका पूर्वीच्या कार्यकर्त्याने व्यक्त केली. परिषदेच्या कामासाठी महाराष्ट्रातून पूर्णवेळ प्रचारक यायचे. अभय भिडे, आशिष भावे, मिलिंद आरोलकर, रत्नप्रभा राहाटे हे गोव्यात पूर्णवेळ काम केलेले प्रचारक. त्याचप्रमाणे गोव्यातून गोव्याबाहेरही प्रचारक जात होते. प्रचारकांचा ओघ थांबल्यामुळे कार्यकर्त्यांची नवीन फळी तयार झाली नाही. त्यामुळे जुने कार्यकर्ते आपापल्या व्यवसायात स्थिरावल्यानंतर कामही मंदावले. याचाच फायदा घेऊन भाजपमध्ये सक्रिय असलेले युवकांचे गट पुढे सरसावले आणि त्यांनी भाजप विद्यार्थी विभाग स्थापन करून त्याखाली विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकाही लढल्या. आज या गटाचे विद्यापीठावर वर्चस्व आहे. भाजपच्या विद्यार्थी विभागाने विद्यापीठावर वर्चस्व प्रस्थापित केले असले, तरी त्यांच्या कार्याचा आवाका हा एखादा अपवाद वगळता विद्यापीठ निवडणुकांच्या सीमा ओलांडणारा नाही. ‘अभाविप’ ही निवडणुका लढविण्याबरोबरच राष्ट्रीय आणि स्थानिक मुद्दे घेऊन आंदोलने करत होती. तसेच विद्यार्थ्यांशी संबंधित उपक्रम वर्षभर चालू असायचे. त्यामुळे ‘आताचा भाजप विद्यार्थी प्रकोष्ठ म्हणजे अभाविप,’ असा समज करून घेऊ नका, असा टोलाही एका जुन्या कार्यकर्त्याने हाणला. १९९१ आणि १९९२ अशी सलग दोन वर्षे अभाविपचे प्रदेशमंत्री म्हणून जबाबदारी पाहिलेले तसेच गोवा विद्यापीठाच्या विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही काम केलेले कामगार नेते अजितसिंग राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना विद्यार्थी चळवळी आता राहिलेल्या नाहीत, असे सांगितले. ते म्हणाले, ‘आमच्या वेळी माझ्यासह माझ्याबरोबरच्या त्या वेळच्या कार्यकर्त्यांनी अगदी निष्ठापूर्वक आणि एक विचार घेऊन अभाविपचे काम केले होते. आज भाजप गोव्यातील सत्तास्थानी पोहोचलेला प्रबळ पक्ष असला, तरी त्या वेळी परिषद भाजपपेक्षा प्रबळ होती. आता भाजप विद्यार्थी प्रकोष्ठ म्हणून एक गट पुढे आला आहे. थेट एखाद्या राजकीय पक्षाचेच अंग बनून एखादी संघटना काम करते, तेव्हा ती सर्वसमावेशक बनू शकत नाही. शिवाय विद्यार्थी चळवळीत असताना केवळ विद्यार्थीहित, समाजहित आणि राष्ट्रहित या गोष्टीच पाहिल्या पाहिजेत. राजकीय आकांक्षांसाठी विद्यार्थी चळवळ हे प्राथमिक व्यासपीठ म्हणून वापरता कामा नये.’