शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

माल्यांच्या ‘किंगफिशर व्हिला’साठी तिसऱ्यांदाही बोली नाही

By admin | Updated: March 6, 2017 20:38 IST

तब्बल ९ हजार कोटींचे कर्ज बुडवून इंग्लंडमध्ये आश्रय घेतलेले मद्यसम्राट विजय मल्ल्या यांच्या मालकीचा कांदोळीतील किंगफिशर व्हिला

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 6 -  तब्बल ९ हजार कोटींचे कर्ज बुडवून इंग्लंडमध्ये आश्रय घेतलेले मद्यसम्राट विजय मल्ल्या यांच्या मालकीचा कांदोळीतील किंगफिशर व्हिला प्राथमिक बोली आणखी दहा टक्क्यांनी कमी करून तिसऱ्यांदा लिलांवात काढला असतानाही खरेदीसाठी कोणी फिरकले नाहीत. मुंबईतील विले-पार्ले येथील किंगफिशर हाऊसलाही चौथ्यांदा कोणीच बोलिदार मिळू शकला नाही. मुंबईतील विले-पार्ले येथील किंगफिशर एअरलाइन्सच्या मुख्यालयाच्या मालमत्तेसाठी १0३.५ कोटी रुपये तर गोव्यातील कांदोळीच्या किंगफिशर व्हिलासाठी ७३ कोटी रुपये प्राथमिक बोली लावण्यात आली. या दोन्ही मालमत्तांच्या बाबतीत विचारणा झाली आणि माहितीही घेण्यात आली, परंतु बोली लावण्यासाठी कोणीच पुढे आला नाही. मल्ल्या यांना कर्ज दिलेल्या बँकांच्यावतीने स्टेट बँकेच्या एसबीआयकॅप ट्रस्टीने कर्जवसुलीसाठी या मालमत्ता विक्रीस काढल्या आहेत. कांदोळीतील किंगफिशर व्हिला डिसेंबरमध्ये झालेल्या लिलांवात ८१ कोटी रुपये प्राथमिक बोली लावली होती ती दहा टक्क्यांनी कमी करण्यात आली. या व्हिलामध्ये मल्ल्या यानी अनेकदा बड्या पार्ट्या झोडलेल्या आहेत. गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये पहिल्या लिलांवाच्यावेळी प्राथमिक बोली ८५.२९ कोटी रुपये होती. विले-पार्लेतील किंगफिशर हाऊसच्या बाबतीत डिसेंबरमध्ये झालेल्या याआधीच्या लिलावात ११५ कोटी लावली होती. गेल्या वर्षी मार्चमध्ये प्रथम ही मालमत्ता विक्रीस काढण्यात आली तेव्हा १५0 कोटी रुपये प्राथमिक बोली होती. दुसऱ्यावेळी लिलावात ती कमी करून १३५ कोटी रुपये करण्यात आली. हे किंगफिशर हाऊस १७ हजार चौरस फूट जागेत आहे. भारतीय स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, आयडीबीआय, बँक आॅफ बडोदा, फेडरल बँक, एक्सिस बँक आदी बँकांचे मिळून सुमारे ९ हजार कोटी रुपये कर्ज मल्ल्या देणे असून गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून त्यांनी इंग्लंडमध्ये आश्रय घेतलेला आहे. (प्रतिनिधी)