शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन खात्यात आता भ्रष्टाचारास थारा नाही!

By admin | Updated: March 22, 2017 01:46 IST

पणजी : पर्यटन खात्याचे व्यवहार आणि एकूण कारभार मी पारदर्शक बनवीन. भ्रष्टाचाराला मुळीच थारा देणार नाही व किनारपट्टी स्वच्छता

पणजी : पर्यटन खात्याचे व्यवहार आणि एकूण कारभार मी पारदर्शक बनवीन. भ्रष्टाचाराला मुळीच थारा देणार नाही व किनारपट्टी स्वच्छता कंत्राटासारख्या वादांची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी घेईन, असे नवे पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी मंगळवारी येथे ‘लोकमत’ला सांगितले.आजगावकर म्हणाले की, शॅक मालक, टॅक्सी व्यावसायिक, टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल एजन्सी आणि पर्यटन व्यवसाय क्षेत्रातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्याची माझी इच्छा आहे. यापूर्वीच्या काळात पर्यटन क्षेत्रात झालेले वाद मला टाळायचेत. गोव्याची पारंपरिक कला व संस्कृती जपूनच आम्हाला पर्यटनाचा विकास करायचा आहे.आजगावकर म्हणाले की, ग्रामीण भागात पर्यटन नेण्यावर आणि इको-टुरिझमवर माझा भर असेल. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना गोव्याच्या निसर्गाचे आणि पारंपरिक व ग्रामीण संस्कृतीचे दर्शन व्हावे, या उद्देशाने पावले उचलली जातील. गोव्याच्या लोककला व लोकसंस्कृतीचे दर्शन पर्यटकांना घडायला हवे. मोपा येथे उभा राहणारा नवा आंतरराष्ट्रीय विमानतळ गोव्याच्या पर्यटन विकासासाठी साहाय्यभूत ठरेल.दरम्यान, कळंगुटचे भाजप आमदार मायकल लोबो म्हणाले की, आजगावकर यांच्याकडून पर्यटनमंत्री म्हणून चांगल्या कामाची अपेक्षा आहे. माझा पर्यटन खात्याबाबतचा अनुभव वाईट आहे. कळंगुट-कांदोळीसह गोव्याच्या संपूर्ण किनारपट्टीतील लोकांनी नव्या पर्यटनमंत्र्यांकडून व त्यांच्या नेतृत्वाखालील पर्यटन खात्याकडून खूप अपेक्षा ठेवलेल्या आहेत. येत्या तीन-चार महिन्यांत मंत्री आजगावकर यांच्या कामाची झलक पाहायला मिळेल, अशी मी आशा करतो. खाण व्यवसायात मंदीचे वातावरण असल्याने पर्यटन हाच गोव्याचा प्रमुख व्यवसाय बनला असून पर्यटन खाते हे या व्यवसायाच्या केंद्रस्थानी आहे, हे नव्या मंत्र्यांनी लक्षात घ्यावे.(खास प्रतिनिधी)