शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

...तर सरकारी कर्मचाऱ्यांना समान वेतनश्रेणी

By admin | Updated: August 1, 2014 01:48 IST

पणजी : सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत तफावत ठेवलेली नाही. सचिवालयात काम करणाऱ्या ज्या कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला जे वेतन दिले जाते,

पणजी : सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत तफावत ठेवलेली नाही. सचिवालयात काम करणाऱ्या ज्या कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला जे वेतन दिले जाते, तसेच वेतन सचिवालयाबाहेर त्याच पदावर काम करणाऱ्या कर्मचारी किंवा अधिकाऱ्याला दिले जाते. तरीही आम्ही वेतनश्रेणीत तफावत निर्माण केल्याचे एखाद्या तिसऱ्या तटस्थ यंत्रणेने दाखवून दिले, तर ती तफावत दूर करून कर्मचारी संघटना म्हणते त्याप्रमाणे समान वेतनश्रेणी द्यायला सरकार तयार आहे, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी सांगितले. गोवा सरकारी कर्मचारी संघटनेने संपाची नोटिस दिल्याने साखळीचे आमदार डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. संपामुळे लोकांची गैरसोय होईल, अशी भीती सावंत यांनी व्यक्त केली होती. त्या लक्षवेधी सूचनेस उत्तर दिल्यानंतर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात गेल्या दोन वर्षांत ३२ टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र, अनेक कर्मचारी अजूनही कार्यालयात उपस्थितही राहत नाहीत. वीस ते पंचवीस टक्के अजूनही काही कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती असते. कर्र्मचारी संघटना वेतनश्रेणीत समानता मागते; पण कर्मचाऱ्यांनी वेळेत कार्यालयात यायला हवे, याची जाणीव ही संघटना कर्मचाऱ्यांना करून देत नाही. अनेक कर्मचारी नावापुरते कार्यालयात येतात व मग दुचाकी घेऊन स्वत:ची वेगळी कामे करण्यासाठी बाहेर जातात. काहीजण पत्नीच्या नावे कंत्राटेही घेतात. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, सचिवालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना जास्त काम करावे लागते. तरीही सचिवालयाबाहेरील खात्यांमध्ये जे काम करतात, त्यांच्या पदांप्रमाणे त्यांना वेतन दिले जात आहे. उदाहरणार्थ एखाद्या डॉक्टराचे वेतन वाढविले गेल्यानंतर सर्वच डॉक्टरांचे वेतन वाढवून आम्ही वेतनश्रेणीत समानता आणली आहे. मात्र, डॉक्टरांचे वेतन वाढविल्याने आता पेशंट अटेंडंटचेही वेतन वाढवा आणि समानता आणा, असा कर्मचारी संघटनेचा आग्रह आहे. वेतन आयोगाच्या शिफारशींच्या चौकटीत अशा प्रकारची मागणी बसत असल्याचे कुणीही दाखवून द्यावे. वेतनश्रेणींच्या विषयाचा अभ्यास असलेल्या एखाद्या यंत्रणेने मला विषय पटवून द्यावा, मी ते मान्य करीन. त्यासाठी कितीही कोटी रुपये कर्मचाऱ्यांना द्यावे लागले तरी चालतील. मात्र, वेतन आयोगाच्या शिफारशींच्या चौकटीत बसत नसेल, तर मी कर्मचारी संघटनेला हवी तशी समान वेतनश्रेणी देणार नाही. (खास प्रतिनिधी)