शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

‘ट्रीपल सीट’ जाणारी दुचाकी बसखाली आली, दोघांचा दुर्देवी अंत

By पंकज शेट्ये | Updated: April 30, 2023 23:11 IST

‘ट्रीपल सीट’ जाताना पोलीस दिसल्याने पळण्याच्या प्रयत्नात असताना घडला अपघात

वास्को: रविवारी (दि.३०) दक्षिण गोव्यातील वास्को शहराच्या अंतर्गत रस्त्यावरून खारीवाडा जाणाºया रस्त्यावर दुचाकी आणि कदंब बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरून ‘ट्रीपल सीट’ प्रवास करणाºया दोन तरुणांचा दुर्देवी अंत झाला तर एक गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर इस्पितळात उपचार चालू आहे. कदंब बसच्या मागच्या चाकाखाली दुचाकी आल्याने मरण पोचलेल्या त्या दुचाकी चालकाचे नाव प्रकाश बिंद (वय ३०) असून त्याच्यामागे बसलेला अरुणकुमार सरोज (वय २१) याचा मृत्यू झाला आहे. त्याच दुचाकीवरून प्रवास करणारा रतीशकुमार सरोज (वय २९) अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर इस्पितळात उपचार चालू आहे.

दुचाकीवरून तिघेहीजण ‘ट्रीपल सीट’ जाताना त्यांची नजर तेथे असलेल्या पोलीसांवर पडल्याने ते तेथून पळण्याच्या प्रयत्नात असताना त्यांची दुचाकी घसरून रस्त्यावर पडून तेथून जाणाºया कदंब बसच्या मागच्या चाकाखाली आली अशी माहीती घटना पाहीलेल्या काहींनी दिली.वास्को पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार रविवारी संध्याकाळी ६.३० च्या सुमारास तो भीषण अपघात घडला. बिर्ला, झुआरीनगर येथे राहणारा प्रकाश बिंद हा दुचाकीच्या मागे अरुणकुमार सरोज आणि रतीशकुमार सरोज यांना बसवून वास्कोत घेऊन आला होता. बिर्ला, झुआरीनगर येथे राहणारे तिघेहीजण वास्कोत दुचाकीवर अयोग्य पद्धतीने ‘ट्रीपल सीट’ आल्यानंतर ते शहरात दुचाकीवरून फीरत होते. ज्यावेळी ते खारीवाडा जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर ‘ट्रीपल सीट’ पोहोचले त्यावेळी दुचाकी चालक प्रकाश बिंद याची नजर तेथे असलेल्या पोलीसांवर पडली.

‘ट्रीपल सीट’ असल्याने पोलीस त्यांना पकडू शकतील अशी कदाचित भिती प्रकाश याला निर्माण झाल्याने त्यांने तेथून पळ काढण्यासाठी दुचाकीची गती वाढवली. त्याचवेळी मडगावहून वास्कोला आलेली कदंब बस वळण घेऊन खारीवाडा बसस्थानकावर जात होती. घटनास्थळावरून पळ काढण्यासाठी दुचाकीची गती वाढवल्यानंतर प्रकाश याचा अचानक दुचाकीवरून ताबा सुटून दुचाकी रस्त्यावर पडून तेथून जाणाºया कदंब बसच्या मागच्या चाकाखाली दुचाकी आली. कदंब बसच्या मागच्या चाकाखाली दुचाकी येऊन घडलेल्या भीषण अपघातात दुचाकी चालक प्रकाश बिंद जागीच ठार झाला अशी माहीती पोलीस सूत्रांनी दिली. त्या अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या अरुणकुमार आणि रतीशकुमार यांना उपचारासाठी त्वरित चिखली उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले. मात्र इस्पितळात पोचण्यापूर्वीच अरुणकुमार याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले अशी पोलीसांनी दिली.

दरम्यान त्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या रतीशकुमार याच्यावर इस्पितळात उपचार चालू असल्याची माहीती पोलीसांनी दिली. दुचाकीवरून ‘ट्रीपल सीट’ प्रवास करणारे ते तिघेहीजण मूळ उत्तरप्रदेश येथील असून काही काळापासून ते बिर्ला, झुआरीनगर भागात रहायचे अशी माहीती पोलीसांनी दिली. वास्को पोलीसांनी रविवारी संध्याकाळी दुचाकी आणि कदंब बस यांच्यात झालेल्या भीषण अपघाताचा पंचनामा केला असून अधिक तपास चालू आहे.

टॅग्स :goaगोवा