शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय संगीताचा आत्मा हरपला; देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात वाहिली आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2022 13:17 IST

फडणवीस म्हणाले की, भारतीय संगीताचे हे दैवत आमच्यात नाही ही कल्पनाच करवत नाही.

पणजी : गोव्यात सध्या निवडणुकीनिमित्त असलेले महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लतादीदींच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त करताना लतादीदींच्या निधनाने केवळ स्वर नाहीत तर भारतीय संगीताचा आत्मा हरपला आहे, असे म्हटले आहे.भाजपच्या गोवा मुख्यालयात लतादीदींना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम झाला. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर व इतर नेते याप्रसंगी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले की, भारतीय संगीताचे हे दैवत आमच्यात नाही ही कल्पनाच करवत नाही. ईश्वराने भारताला दिलेली अमूल्य देणगी हिरावून घेतली आहे.‘ऐ मेरे वतन के लोगो’तून प्रत्येकाच्या अश्रूंना वाट मोकळी करून देण्याचे सामर्थ्य जसे त्यांच्या सुरांमध्ये होते, तसेच अनेकांच्या आयुष्यातील स्वप्नांना आणखी उंच भरारी घेण्यासाठी बळ देण्याचे काम लतादिदींच्या सुरांनी केले.

फडणवीस म्हणाले की, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निस्सिम भक्ती आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी जपली. वीर सावरकरांच्या विचारांची तन-मन-धनाने सेवा करण्याचे काम लतादीदींनी केले. प्रखर राष्ट्रवाद जपणारे हे संपूर्ण मंगेशकर कुटुंब लतादीदींनी कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेतून जपले.  विविध कार्यक्रमांमध्ये अनेकदा त्यांची भेट व्हायची. प्रत्येकवेळी आपुलकीने विचारपूस असायची. भेट झाली नाही, तर फोन करून ‘कसा आहेस देवेंद्र’ हे शब्द मोठ्या बहिणीची उणीव भरून काढणारे असायचे. त्यांचे जाणे, ही माझी सुद्धा वैयक्तिक आणि मोठी हानी आहे.’

लतादीदींच्या जाण्याचे अतीव दु:ख-  भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडे

भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी तीव्र शोक व्यक्त करताना असे म्हटले आहे की,‘लतादीदींच्या जाण्याने भारतीय संगीत क्षेत्राचे खास करून चित्रपट संगीत क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. लतादीदींचे वडील दीनानाथ मंगेशकर हे मूळचे गोव्याचे. यामुळे लतादीदींचे गोव्याशी कौटुंबिक नाते होते. संगीत क्षेत्रातील त्यांचे योगदान पुढील कैक पिढ्या विसरता येणार नाहीत.’

टॅग्स :Lata Mangeshkarलता मंगेशकरgoaगोवाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस