शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याच्या राजभवनने माहिती नाकारल्या प्रकरणी आव्हान देणारे दोन्ही अर्ज फेटाळले

By किशोर कुबल | Updated: April 18, 2023 14:17 IST

माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केंद्राशी केलेल्या पत्र व्यवहारांचे प्रकरण

पणजी : माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्र्यांविरोधात पाठवलेल्या पत्रांच्या प्रती राजभवनने नाकारल्या प्रकरणी आव्हान देणारे समाज कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्ज यांचे दोन अर्ज राज्याचे मुख्य माहिती आयुक्त विश्वास सतरकर यांनी फेटाळून लावले आहेत.

आयरिश असा दावा आहे की, मलिक यांनी राज्यपाल असताना मुख्यमंत्र्याविरुद्ध पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्रे लिहून गोव्यातील भाजप सरकारच्या भ्रष्टाचार आणि गैरकारभाराचा कथित तपशील दिला आहे. या पत्रांच्या प्रति तसेच केंद्राकडून त्यांना त्यावेळी मिळालेली उत्तरे याच्या प्रती मी  मागितल्या होत्या. ही माहिती मला नाकारण्यात आली.'

हा पत्र व्यवहार आरटीआयच्या कक्षेत येत असला तरी राजभवनने आपल्याला माहिती नाकारली. माहिती न देणे बेकायदेशीर, असमर्थनीय आणि संशयास्पद हेतूने असल्याचे आयरिश यांचे म्हणणे आहे. ३ नोव्हेंबर २०१९ ते १८ ऑगस्ट २०२० या काळात गोव्यातील तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना लिहिलेल्या सर्व अधिकृत पत्रांच्या प्रती रॉड्रिग्स यांनी गोव्याच्या राजभवनाकडे मागितल्या होत्या. परंतु जन माहिती अधिकारी (पीआयओ) गौरीश शंखवाळकर यांनी माहिती नाकारली.

दुसऱ्या अर्जात अॅड. रॉड्रिग्स यांनी ३ नोव्हेंबर २०१९ ते १८ऑगस्ट २०२० पर्यंत गोव्याच्या राज्यपालांना पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांकडून प्राप्त झालेल्या सर्व अधिकृत पत्रांची प्रत मागितली होती. ही माहितीही नाकारताना शंखवाळकर यांनी पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची अधिकृत पत्रे सीलबंद लिफाफ्यांमध्ये प्राप्त झाली होती आणि ती राज्यपालांच्या वैयक्तिक सचिवांना देण्यात आली होती. त्या पत्रांमधील मजकूर माहित नाही आणि ते रेकॉर्डचा भाग नाहीत, असे नमूद करून ही माहितीही नाकारली. त्यामुळे आयरीश यांनी दोन वेगवेगळी अपिले मुख्य माहिती आयुक्तांकडे सादर केली होती.

टॅग्स :goaगोवा