शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

कवळे पंचायत क्षेत्रातील भंगार अड्डे प्रकरणी पंचायत मंडळ सक्त 

By आप्पा बुवा | Updated: April 7, 2023 17:53 IST

कवळे ग्रामपंचायत क्षेत्रात मोठ्या संख्येने भंगार अड्डे निर्माण झाले असून, लोकांच्या वाढत्या तक्रारीची दखल घेऊन पंचायत मंडळांने सदर भंगार अड्ड्याविरुद्ध सक्त कारवाई करण्याचे ठरवले आहे.

फोंडा कवळे ग्रामपंचायत क्षेत्रात मोठ्या संख्येने भंगार अड्डे निर्माण झाले असून, लोकांच्या वाढत्या तक्रारीची दखल घेऊन पंचायत मंडळांने सदर भंगार अड्ड्याविरुद्ध सक्त कारवाई करण्याचे ठरवले आहे.

सरपंच मनूजा नाईक, उपसरपंच सुशांत कपिलेश्वरकर व इतर पंचमंडळाने गुरुवारी सर्व भंगार अड्डय़ाची पाहणी केली. यावेळी सरकारी अधिकारी सुद्धा त्यांच्याबरोबर उपस्थित होते.ज्यावेळी पंचायत मंडळाने भंगार अड्डय़ावर  पाहणी केली त्यावेळी काही धक्कादायक प्रकार उघडकीस आले. मुख्य म्हणजे काहीच परवानगी न घेता हे निर्माण करण्यात आले आहेत. या भंगार अड्डय़ा ठिकाणीच कामगारांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सदर कामगार येथेच जेवण वगैरे करतात .ईथे रिकामी असलेली  रासायनिक बॅरल्स तसेच इतर औद्योगिक साहित्य आणले जाते. येथे गॅस सिलेंडर वापरून जेवण करण्यात येत असल्याने एका दिवशी ह्या रासायनिक बॅरल्सच्या संपर्कात येऊन मोठा स्फोट  होऊ शकतो. मोठी आग सुध्दा लागू शकते.

सरपंचांनी दिलेल्या माहितीनुसार सदर भंगारअड्डे प्रकरणी ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी आलेल्या आहेत. सदर तक्रारीची दखल घेऊनच भंगार अड्ड्यांची पाहणे करण्यात आलेली आहे.त्या म्हणतात इथले जे काही बेकायदेशीर प्रकार आहेत ते यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत. या संबंधीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात  पाठवलेला असून त्यांच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.मागची अनेक वर्षे भंगार अड्डे कवळे ग्रामपंचायत क्षेत्रात आहेत.  सदरची संख्या पंधराच्या वर आहे.वेळोवेळी ग्रामसभेत या विषयावरून बाचाबाची सुद्धा झालेली आहे. असे असतानाही एवढी वर्षे सदर भंगार अड्ड्यावर कारवाई का होत नाही हा प्रश्न आज उपस्थित होत आहे. कुणाच्या आशीर्वादाने हे सर्व चालू होते . असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.