शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई मार्गे ड्रग्स येणार असल्याची गोवा पोलिसांना होती माहिती

By वासुदेव.पागी | Updated: October 14, 2023 13:24 IST

गोव्यात मुंबई मार्गे मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थचा कन्साईन्मेंट गोव्यात पुरविला जाणार असल्याची माहिती गोवा अंमली पदार्थ विभागाला मिळाली होती.

पणजी:  गोव्यात मुंबई मार्गे मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थचा कन्साईन्मेंट गोव्यात पुरविला जाणार असल्याची माहिती गोवा अंमली पदार्थ विभागाला मिळाली होती. तो मुंबईतून सुटला जरी असता तरी गोवा पोलीस तो पकडण्यासाठी सतर्क आणि सज्ज होते असे गोवा पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी विभागाचे अधीक्षक बोसुएट सिल्वा यांनी म्हटले आहे. 

केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) मुंबई शाखेने मुंबईत १३५ कोटी रुपये किंमतीचा अंमली पदार्थ शुक्रवारी जप्त केला.  हा अंमली पदार्थ गोव्यासह इतर काही राज्यात पुरवठा केला जाणार होता. अधीक्षक सिल्वा यांना एनसीबीच्या या कारवाईविषयी विचारले असता ते म्हणाले की,  मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचा पुरवठा मुंबई मार्गे होणार असल्याचे संकेत   गोवा पोलिसांनाही मिळाले होती आणि एनसीबीलाही मिळाले होते. गोव्यात अंमली पदार्थ विरोदी विभाग सतर्क होता. सर्व यंत्रणेही सज्ज करण्यात आली होती. मुंबईतून हा ड्रग्स निसटला असता तरीही गोव्यात येणारा माल पकडला गेला असता असे ते म्हणाले. 

दरम्यान, गोव्यात नेमका कुठे हा अंमली पदार्थ  पुरविला जाणार होता याची माहिती मात्र गोवा पोलिसांना नव्हती. एका ठिकाणी नव्हे तर एकपेक्षा अधिक ठिकाणावर त्याचा पुरवठा केला जाणार होता असा अंदाज असल्याचेही सिल्वा यानी सांगितले. 

मुंबईत पकडला गेलेला अंमली पदार्थ  गोव्यासह बेंगळुरू, दिल्ली, हैदराबाद येथे पाठवला जाणार होता. या प्रकरणी तीन विदेशी नागरिक व दोन महिलांसह एकूण ९ जणांना अटक करण्यात आली आहे. अमली पदार्थ तयार करणाऱ्या दोन मोठ्या प्रयोगशाळाही उध्वस्त करण्यात आल्या, अशी माहिती एनसीबीच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.