मडगाव/केपे : लोकमान्य टिळक टर्मिनसहून एर्नाकुलमकडे जाणाऱ्या दुरोंतो एक्सप्रेस या रेलगाडीचे दहा डबे सारझोरा येथे बोगद्याजवळ रुळावरून घसरले. रविवारी सकाळी ६.२१ वा. ही घटना घडली. यात प्रवाशांना कोणतीही इजा पोहोचली नाही. कारवारहून एर्नाकुलमला जाण्यासाठी या प्रवाशांसाठी खास रेल्वे उपलब्ध करून देण्यात आली. या प्रवाशांना खाद्यपदार्थ व जेवणाची सोय या रेल्वेमध्ये करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत घसरलेले डबे वर काढण्याचे काम गतीने चालू होते. सोमवारपासून (दि.४) हा मार्ग वाहतुकीसाठी पुन्हा खुला होईल, अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिली. अपघातामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कोकण रेल्वे महामंडळाचे वाहतूक व्यवस्थेचे संचालक संजय गुप्ता यांनी घटनास्थळाची पाहणी केली. १२२२३ क्रमांकाची ही रेल्वे कुर्लाहून एर्नाकुलमला जात होती. १३ डब्यांची ही रेल्वे संपूर्ण वातानुकूलित आहे. मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकावर थांबा घेतल्यानंतर पुढील प्रवासास जाताना हा अपघात घडला.(पान २ वर)े
दुरोंतो एक्सप्रेसचे १० डबे बोगद्यात रुळावरून घसरल
By admin | Updated: May 4, 2015 01:21 IST