शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

हणजूण होते टार्गेट!

By admin | Updated: February 13, 2016 02:52 IST

हणजूण/मुंबई : इस्रायली नागरिकांचे प्रार्थनेसाठी एकत्र येण्याचे ठिकाण म्हणजेच येथील छाबड हाउस उडवून देण्याचे ठरले होते, अशी कबुली अमेरिकन नागरिक डेव्हीड

हणजूण/मुंबई : इस्रायली नागरिकांचे प्रार्थनेसाठी एकत्र येण्याचे ठिकाण म्हणजेच येथील छाबड हाउस उडवून देण्याचे ठरले होते, अशी कबुली अमेरिकन नागरिक डेव्हीड हेडलीने शुक्रवारच्या जबाबात दिल्याने हणजूण पुन्हा चर्चेत आले. लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने तसा कट आखला होता, असा गौप्यस्फोटही हेडलीने केला. अमेरिकेतील अज्ञात स्थळावरून मुंबईतील विशेष मोक्का न्यायालयात व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष नोंदवताना हेडलीने ही माहिती दिली. अमेरिकन वेळेनुसार रात्री साडेआठ वाजता सुरू झालेली साक्ष मध्यरात्री अडीच वाजता संपली. अमेरिकन नागरिक डेव्हीड हेडली २६/११च्या मुंबईच्या हल्ल्यात माफीचा साक्षीदार आहे. हणजूण-वागातोर परिसरात पर्यटन हंगामात लक्षणीय गर्दी होते. येथील छाबड हाउसवर दहशतवाद्यांचा हल्ला होणार असल्याची माहिती काही वर्षांपूर्वी मिळाली होती. त्यानंतर तेथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवला होता. हणजूण येथे छाबड हाउसच्या जागा आतापर्यंत चार ते पाच ठिकाणी बदललेल्या आहेत. सध्याचे छाबड हाउस हणजूण येथील सेंट अँथोनी प्रायस वाडो येथे भाड्याच्या घरात आहे. जानेवारी २०१६ मध्ये हे घर भाड्याने घेतले असून सध्या तेथे दोघे इस्रायली युवक राहातात. शुक्रवारी सायंकाळी या ठिकाणी प्रार्थनेसाठी १२ इस्रायली युवक जमा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. चार-पाच वर्षांपासून इस्रायली नागरिकांनी हणजूण येथून हरमल येथे स्थलांतर करणे पसंत केले आहे. तेथे आता मोठ्या संख्येने लोक प्रार्थनेसाठी एकत्र येतात. या स्थलांतरापूर्वी छाबड हाउसमध्ये एका वेळच्या प्रार्थनेसाठी २००हून अधिक इस्रायली नागरिक हणजूण येथे एकत्रित जमत असत. (प्रतिनिधी)