शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय पासपोर्ट रद्द करण्याच्या प्रश्नावर तानावडे यांनी राज्यसभेत आवाज उठवला

By किशोर कुबल | Updated: December 9, 2023 05:25 IST

१९६१ साली गोवा पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त झाला. तत्पूर्वी गोव्यात जन्मलेल्या प्रत्येक नागरिकाची नोंदणी पोर्तुगालमध्ये नोंद झालेली आहे

पणजी : पोर्तुगालमध्ये जन्म नोंदणी असलेल्या गोवेकरांचे भारतीय पासपोर्ट रद्द करण्याच्या प्रश्नावर राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी काल राज्यसभेत आवाज उठवला.

केवळ पोर्तुगालमधील जन्म नोंदणीवरुन भारतीय पासपोर्ट रद्द करणे अयोग्य असून  तानावडे यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांना पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे.येथील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने ७० हून अधिक लोकांचे पासपोर्ट रद्द केल्याने चिंता वाढली आहे. या व्यक्तींना पोर्तुगीज सरकारकडून अधिकृत नागरिकत्व दस्तऐवज मिळेपर्यंत भारतीय पासपोर्टचे नूतनीकरण करण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव मंत्रालयाला दिला आहे. तानावडे यांनी राज्यसभेत आवाज उठवल्याने पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी त्यांचे आभार मानले असून तानावडे यांनी घेतलेल्या सक्रिय भूमिकेचे स्वागत केले आहे.

याबाबतची पार्श्वभूमीची अशी आहे की, १९६१ साली गोवा पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त झाला. तत्पूर्वी गोव्यात जन्मलेल्या प्रत्येक नागरिकाची नोंदणी पोर्तुगालमध्ये नोंद झालेली आहे. या नागरिकांना आता पासपोर्ट मिळवणे कष्टप्रद बनले आहे. पोर्तुगीज काळात जन्म नोंदणी असलेले आणि त्यानंतर पोर्तुगीज पासपोर्ट मिळवलेले अनेक राजकीय नेतेही निवडणूक लढविल्यानंतर गोत्यात आलेले आहेत. प्रकरणे कोर्टापर्यंत गेलेली आहेत