शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात पर्यटकांची काळजी सुरक्षा दल घेणार- मुख्यमंत्री

By admin | Updated: August 16, 2016 20:23 IST

पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे काम पर्यटक सुरक्षा दल करणार आहे

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 16 - गोव्यातील किनारपट्टीवर तसेच अन्य पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे काम पर्यटक सुरक्षा दल करणार आहे. किनारपट्टीवर काही बेकायदा व गैर घडू नये म्हणूनही काळजी घेण्याचे काम हा दल करील, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मंगळवारी येथे पत्रकारांना सांगितले.गोव्यात पर्यटकांची संख्या वाढली आहे. शनिवारपासून सलग तीन दिवस सुट्टी मिळाल्यानेही मोठय़ा संख्येने पर्यटक गोव्यात आले होते. जरा सुट्टी मिळाली की पर्यटकांचे पाय गोव्याकडे वळतात. यामुळेच हॉटेलांच्या खोल्यांचे भाडेदरही वाढले आहेत. भाजपचेच एक आमदार मायकल लोबो यांचे हॉटेल असून त्यांच्या खोलीचे भाडे पावसाळ्य़ात प्रति दिन दोन हजार रुपये असते पण यावेळी ते पंधरा हजार रुपये झाले, असे उदाहरणही मुख्यमंत्री पार्सेकर यांनी दिले.मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पर्यटक सुरक्षा दलाची स्थापना यापूर्वी झाली असून या दलात पन्नास पदे भरली जाणार आहेत. हा प्रस्ताव मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुर केल्याचे पार्सेकर यांनी सांगितले. 33 माजी सैनिक, 19 चालक, 4 कारकून, 6 तालुका सुपरवायझर, 1 मुख्य पर्यटक सुरक्षा रक्षक यांची भरती दलामध्ये केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.दरम्यान, गोमेकॉसह सरकारी इस्पितळांमधील नॉन- टिचिंग डॉक्टरांच्या निवृत्ती वयात सरकारने 6क् वरून 62 र्पयत दोन वर्षाची वाढ केली. मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत तसा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी गोमेकॉतील टिचिंग विभागातील डॉक्टरांच्या निवृत्ती वयात साठवरून पासष्ट वयार्पयत पाच वर्षाची वाढ करण्यात आली. आता नॉन टिचिंग डॉक्टरांच्या निवृत्ती वयात वाढ झाल्याचा लाभ सुमारे शंभर डॉक्टरांना मिळेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.पाच सरकारी तंत्रनिकेतन संस्थांमध्ये (पॉलिटेक्नीक) एकूण 46 व्याख्यात्यांची कंत्रट पद्धतीवर नियुक्ती करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.यापूर्वी मुलाखती घेऊन व्याख्यात्यांची निवडही करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती आता कंत्रट पद्धतीवर केली जाईल. अनुभवानुसार वेतन मिळेल. किमान तिस हजार व कमाल अडतीस हजार रुपयांचे वेतन निश्चित करण्यात आले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.सहकार खात्यात ऑडिट सहाय्यकांच्या बारा जागा यापूर्वी रद्दबातल ठरल्या होत्या. त्या पुनरुज्जीवीत करण्यात आल्या आहेत. सहकार खात्याची पाच विभागीय कार्यालये आहेत. आता सहावे कार्यालय डिचोलीत साकारले आहे. या कार्यालयासाठी पंधरा नवी पदे मंत्रिमंडळाने निर्माण केली. त्यात एक सहाय्यक निबंधक, दोन वरिष्ठ ऑडिटर्स, तीन कनिष्ठ ऑडिटर्स, दोन कारकून, दोन प्यून आदी पदांचा समावेश आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.