शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

स्वीमिंग पूलचा वापर चित्रीकरणासाठी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 02:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : राज्यातील सरकारी स्वीमिंग पुलांचा वापर यापुढे खेळाडूंची गैरसोय करून सिनेमांच्या चित्रीकरणासाठी करू दिला जाणार नाही,

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : राज्यातील सरकारी स्वीमिंग पुलांचा वापर यापुढे खेळाडूंची गैरसोय करून सिनेमांच्या चित्रीकरणासाठी करू दिला जाणार नाही, असे क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले. मी क्रीडामंत्री असतानाच राज्याचे क्रीडा धोरण तयार झाले. तत्पूर्वी ते कधीच तयार झाले नव्हते. त्या धोरणामुळे विद्यार्थ्यांना क्रीडा गुण मिळू लागले. खेळाडू तयार करण्यासाठी अधिकाधिक मदत करणे हे सरकारचे प्राधान्य आहे. राज्यात क्रीडा क्षेत्रात साधनसुविधा कमी नाहीत. मैदाने तर प्रत्येक ठिकाणी आहेत. खेळाडूच तयार व्हायला हवेत. फुटबॉलसाठी प्रशिक्षकांची संख्या प्रचंड आहे; पण खेळाडू किती तयार होतात ते पाहावे लागेल. स्वीमिंगच्या क्षेत्रात जे युवक-युवती व मुले वावरत आहेत, त्यांना सरकार प्रोत्साहन देईल. त्यांची गैरसोय करून यापुढे स्वीमिंग पुलांचा वापर चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी करू दिला जाणार नाही, असे मंत्री आजगावकर यांनी नमूद केले. खेळाडूंसाठी सरकार निधी खर्च करील आणि मुख्यमंत्री त्यासाठी निश्चितच निधी उपलब्ध करून देतील, असा विश्वास मंत्री आजगावकर यांनी व्यक्त केला.कुमारी शृंगी राजेश बांदेकर व इतरांनी स्वीमिंग स्पर्धेत राष्ट्रीय व राज्य स्पर्धांमध्ये मोठे यश मिळवून विविध पदके प्राप्त केल्याबाबत त्या सर्वांचे विधानसभेत गुरुवारी अभिनंदन करण्यात आले. अभिनंदनाचा ठराव आमदार नीलेश काब्राल यांनी मांडला होता. मंत्री आजगावकर यांनीही या खेळाडूंचे अभिनंदन केले व क्रीडा क्षेत्रात यापुढेही जास्त सुविधा निर्माण करू, अशी ग्वाही दिली. आमदार नीळकंठ हळर्णकर, दिगंबर कामत, चर्चिल आलेमाव, प्रसाद गावकर, प्रतापसिंग राणे आदींनी या वेळी आपले विचार मांडले व खेळाडूंचे अभिनंदन केले. स्वीमिंगच्या क्षेत्रातील खेळाडूंना यापूर्वीच्या सरकारच्या काळात परप्रांतामध्ये जाताना क्रीडा खात्याकडून केवळ शंभर-दीडशे रुपयांची बॅग देण्यात आली. जलतरण क्षेत्रात नाव कमावू पाहणाऱ्या खेळाडूंसाठी सरकारने प्रशिक्षकांची सोय करावी. आम्ही काही पालकांनी अशा खेळाडूंसाठी स्वखर्चाने प्रशिक्षक नेमलेले आहेत, असे हळर्णकर यांनी सांगितले. प्रत्येक मतदारसंघात स्वीमिंग पूलची व्यवस्था व्हावी, असे राणे म्हणाले.