शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

संशयास्पद पाकिस्तानी बोट

By admin | Updated: January 4, 2015 02:29 IST

संशयास्पद पाकिस्तानी बोट गोव्याच्या दिशेने जात असल्याच्या वृत्ताचा तटरक्षक दलाच्या गोवा विभागाने शनिवारी इन्कार केला.

वासुदेव पागी/अनिल चोडणकर-वास्को : संशयास्पद पाकिस्तानी बोट गोव्याच्या दिशेने जात असल्याच्या वृत्ताचा तटरक्षक दलाच्या गोवा विभागाने शनिवारी इन्कार केला. अशी बोट गोवा समुद्रात तटरक्षक दलाला आढळलेली नाही. तसेच सुरक्षा यंत्रणांकडूनही या संदर्भात सूचना आली नसल्याचे तटरक्षक दलाने म्हटले आहे. संशयित पाकिस्तानी बोटीचा अरबी समुद्रातील भारताच्या हद्दीत विस्फोट झाल्यानंतर एक संशयित बोट गोव्याच्या दिशेने गेल्याचे वृत्त एका राष्ट्रीय वृत्तपत्रातून दिले होते. या संदर्भात तटरक्षक दलाच्या गोवा कार्यालयात संपर्क साधला असता हे वृत्त खोटे असल्याचे सांगण्यात आले. तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक एम. व्ही. बाडकर यांनी दै. ‘लोकमत’ला सांगितले की, पाकिस्तानी बोटींचा संचार हा केवळ गुजरात नजीकच्या सागरी क्षेत्रापुरताच मर्यादित होता. गोव्याच्या समुद्रात अशा प्रकारची बोट आढळण्याचे सोडाच तर गोव्याच्या दिशेनेही संशयास्पद बोट आलेली नाही. गोवा किनारपट्टीच्या दिशेने बोट निघाली असती तर सर्वात अगोदर तटरक्षक दलाला सूचना मिळाल्या असत्या आणि एव्हाना तटरक्षक दलाच्या कारवायाही सुरू झाल्या असत्या, असे तटरक्षक दलाचे लोकसंपर्क अधिकारी अक्षय जैन यांनी सांगितले. तसे काही असते तर शनिवारी सुट्टीचा दिवस असूनही सर्व अधिकाऱ्यांनी कार्यालयात धाव घेतली असती. तसेच सुट्टीवर गेलेले अधिकारीही सुट्टी रद्द करून आले असते, असे ते म्हणाले. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गोवा तटरक्षक दलाच्या ताफ्यात वास्को केंद्रात तीन गस्ती नौका आहेत. या तिन्हीही नौका किनाऱ्यावर ठेवलेल्या एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’च्या प्रतिनिधींना दाखविल्या.