शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चांदर रस्ता रोको प्रकरणातील संशयितांवर खटला चालणार; पुढील सुनावणी २ ऑगस्टला

By सूरज.नाईकपवार | Updated: July 12, 2023 12:07 IST

आरोप मुक्ततेचा संशयितांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

मडगाव:  गोव्यातील चांदर रेल्वे आंदोलनाच्या वेळी रस्ता रोको प्रकरणातील संशयितांवरील खटला पुढे चालू राहणार आहे. आपल्यावरील आरोपातून मुक्त करावे या संशयिताचा अर्ज न्यायालयाने आज नामंजूर केला आहे. पुढील सुनावणी आता २ ऑगस्ट रोजी होणार आहे. मडगावच्या प्रथमवर्ग न्यायालयाने वरील निवाडा दिला. रेल्वे दुपरीकरणाच्या कामाच्या विरोधात दक्षिण गोव्यातील सासष्टी तालुक्यातील चांदर येथे १ नोव्हेंबर २०२० मध्ये आंदोलन झाले होते. यावेळी रस्ताही अडविण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशन्वये पोलिसांनी संशयितांवर रस्ता अडविल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते.

पर्यावरणवादी अभिजित प्रभूदेसाई, कॅ. विरियातो फर्नंाडीस , डायना तावारीस, सबिता मास्कारेन्स व अन्य संशयित आहेत. या संशयितांनी आरोपनिश्चितीपुर्वी निर्देष मुक्त करण्याचा अर्ज केला होता. सरकारपक्षातर्फे त्याला विरोध करण्यात आला होता,ज्या दिवशी आदोंलन झाले होते. त्या दिवशी दक्षिण गोव्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी एका आदेशाद्वारे हा मार्ग सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद केला हाेता, त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीला अडथळा आणण्याचा आरोप दाखल करुन घेणेच शक्य नाही असा दावा करत संशयितांनी या खटल्यातून आम्हाला मुक्त करावे अशी मागणी केली होती.

तर सरकारपक्षाने त्याला विरोध करताना संंशयितांविरोधात प्रथमदर्शनी पुरावा असल्याचे सिध्द झाले आहे. संशयितांनी उपस्थित केलेला मुद्दा ग्राह आहे की नाही यावर आरोपनिश्चित करण्याच्या प्रक्रियेच्यावेळी विचार करणे शक्य असल्याचे नमूद केले होते. ज्या रस्त्यावर आंदोलन करण्यात आले तो रस्ता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाव्दारे रात्री १२ वाजल्यापासून पहाटे पाच वाजेपर्यंत बंद करण्यात आला होता. त्यामुळे बंद रस्ता रोखल्याचा आरोप होउ शकत नाही. २५ पैकी २० साक्षिदार हे पोलिस कर्मचारी असून, हा खटला खोटया माहितीच्या आधारे केलेला आहे असा दावा संशयितांनी केला होता.

टॅग्स :goaगोवाCourtन्यायालय