शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सुरेशकुमार सोळंकी शेवटी माफीचा साक्षीदार, अन्य संशयिताचा आक्षेप न्यायालयाने फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 21:08 IST

कुडचडे येथील बसूराज बारकी खून प्रकरणातील संशयित सुरेशकुमार सोळंकी याला माफीचा साक्षीदाराची सवलत देऊ नये हा इतर संशयितांनी घेतलेला आक्षेप दक्षिण गोव्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश सायोनोरा लाड यांनी फेटाळून लावताना सदर संशयिताला माफीचा साक्षीदार म्हणून सोमवारी जाहीर केले.

मडगाव: कुडचडे येथील बसूराज बारकी खून प्रकरणातील संशयित सुरेशकुमार सोळंकी याला माफीचा साक्षीदाराची सवलत देऊ नये हा इतर संशयितांनी घेतलेला आक्षेप दक्षिण गोव्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश सायोनोरा लाड यांनी फेटाळून लावताना सदर संशयिताला माफीचा साक्षीदार म्हणून सोमवारी जाहीर केले.मागच्या एप्रिल महिन्यात झालेल्या या खून प्रकरणात अभियोग पक्षाला मदत करण्याची आपली तयारी आहे, असा दावा करून सोळंकी याने आपल्याला माफीचा साक्षीदार बनवावे असा अर्ज न्यायालयाकडे केला होता. या अर्जाला सरकारी अभियोक्ता व्ही. जे. कोस्ता यांनी ना हरकत दिली होती. मात्र एका संशयिताने या अर्जाला हरकत घेतली होती. मात्र सोमवारी ही हरकत फेटाळण्यात आली.कुडचडे येथे एका फ्लॅटात 2 एप्रिल रोजी बसूराज याचा खून त्याची पत्नी कल्पना बारकी हिने आपल्या मित्रांच्या सहाय्याने केला होता. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून ते पोत्यात भरून मोलेच्या जंगलात फेकून दिले होते. त्यानंतर कल्पना हा फ्लॅट सोडून दुस-या ठिकाणी रहायला गेली होती. या खुनाची सुरुवातीला कुणीच वाच्यता केली नव्हती. मात्र सदर खून स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलेल्या कल्पनाच्या एका मैत्रिणीने एक महिन्यांनंतर त्याला वाच्यता फोडल्यानंतर कुडचडे पोलिसांनी कल्पनासह पाच जणांना अटक केली होती.यापैकी सुरेश सोळंकी याच्या वतीने अ‍ॅड. अमेय प्रभूदेसाई यांनी बाजू मांडताना स्वत:चा अशील अभियोग पक्षाला मदत करण्यास तयार असल्याचे सांगितले होते. मात्र आणखी एका संशयिताने या खुनात सुरेशकुमारचा सहभाग इतर संशयितांएवढाच होता. त्यामुळे त्याला ही सवलत देऊ नये, अशी मागणी केली होती. दमलरम्यान, या प्रकरणातील अन्य एक संशयित पंकज पवार याने जामिनासाठी केलेल्या अर्जावर 29 नोव्हेंबर रोजी न्या. लाड निकाल देणार आहेत. अ‍ॅड. राजीव गोमीस यांनी या जामीन अर्जावर युक्तीवाद केला होता.