पणजी : मंगळुरमध्ये पबमधून बाहेर पडणाऱ्या तरुणांवर हल्ला केल्यानंतर देशभरात टीकेचा धनी ठरलेला श्रीराम सेनेचा वादग्रस्त नेता प्रमोद मुतालिकच्या भूमिकेचे गोवा भाजपाने समर्थन केले आहे. भाजपा प्रवक्ते डॉ. विल्फ्रेड मिस्किता यांनी मुतालिकच्या समर्थनार्थ थेट पत्रकार परिषदच घेतली. प्रमोद मुतालिकच्या श्रीराम सेनेवर बंदी घालता येणार नाही; कारण मुतालिक गोव्यात कदाचित गोवा सेना वगैरे स्थापन करेल, असेही तारे त्यांनी तोडले. श्रीराम सेनेवर बंदी घालण्याऐवजी संघटनेच्या कारवायांवर बंदी घालायला हवी, असे ते म्हणाले. मुतालिकच्या विचारात काहीही गैर नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. मुतालिक यांनी रामनाथी येथे बोलताना आपण गोव्यात श्रीराम सेनेची शाखा सुरू करू, असे आव्हान दिले होते. (खास प्रतिनिधी)
मुतालिकच्या भूमिकेचे गोवा भाजपकडून समर्थन
By admin | Updated: June 28, 2014 01:50 IST