शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

"गोव्यात सनबर्नला सायंकाळी ६ नंतर परवानगी नको, तारीखही बदला"

By किशोर कुबल | Updated: November 28, 2023 13:29 IST

सरकारने २८ ते ३१  डिसेंबरऐवजी अन्य तारीख सनबर्नला द्यावी किंवा सायंकाळी ६ नंतर मनाई करावी.

किशोर कुबल/पणजी

पणजी : सत्तधारी आमदार मायकल लोबो यांची री ओढताना आपचेगोवा प्रमुख ॲड. अमित पालेकर यांनीही सरकारने सनबर्नची तारीख बदलावी किंवा सायंकाळी ६ नंतर परवानगी देऊ नये अशी मागणी केली आहे. पालेकर म्हणाले की, सरकारने शॅक वितरणास आधीच विलंब केल्याने  व्यावसायिकांचा धंदा बुडाला. वर्ष अखेरीस पर्यटकांची गोव्यात गर्दी असते. परंतु त्याच वेळी सनबर्नचे आयोजन केले जात असल्याने पर्यटक तेथे वळतात व शॅकवाल्यांना ग्राहक मिळत नाहीत. सरकारने २८ ते ३१  डिसेंबरऐवजी अन्य तारीख सनबर्नला द्यावी किंवा सायंकाळी ६ नंतर मनाई करावी.

पालेकर म्हणाले कि, सनबर्नवाले कमावून जातात परंतु गोमंतकीय शॅक व्यावसायिकांचा धंदा बुडतो. शिवाय सनबर्नमुळे वागातोर भागात गर्दी होते व लोक स्थानिक रेस्टॉरण्टसमध्ये जाणेही टाळतात.दरम्यान, सत्ताधारी आमदार मायकल लोबोही यांनीही सायंकाळी ८ नंतर सनबर्नला परवानगी देऊ नये अशी मागणी केलेली आहे.

सनबर्न ईडीएम उत्तर गोव्यात वागातोर किनारी दरवर्षी होत असतो. देश विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने या ईडीएमला उपस्थिती लावतात. यापूर्वी अतिप्रमाणात  ड्रग्स सेवन करुन मृत्यूमुखी पडण्याचे प्रकारही या ईडीएममध्ये घडलेले आहेत. कंपनीने या ईडीएमसाठी बूकिंग सुरु केले आहे.

टॅग्स :goaगोवाAAPआप