अजय जोशी : पणजी सलमान खानचा बहुचर्चित चित्रपटसुलतानचे राज्यात 122 खेळ सुरू आहेत. अवघ्या दोन दिवसांत या चित्रपटाचे 244 खेळ तेही हाऊसफुल्ल झाले आहेत. सलमान आणि त्याचा नवीन चित्रपट म्हटले, की अर्थातच त्याचा अगोदरच प्रचंड गाजावाजा झालेला असतो. रसिक त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात असतात. यंदाही ईदच्या मुहुर्तावर सुलतान देशभर झळकला आणि गोव्यात तर या चित्रपटाने कोटींची उड्डाणो घेतली.
राज्यात सध्या हिंदी भाषेतील कोणताही नवा तसेच दमदार पटकथेचा एकही चित्रपट झळकलेला नाही. अर्थातच सलमानसारख्या सुपरहिट अभिनेत्याचा चित्रपट असला की आपल्या चित्रपटाच्या व्यवसायावर परिणाम नको म्हणून अनेकजण आपल्या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकणो पसंत करतात. त्यामुळे हिंदीसह अन्य भाषिक नव्या चित्रपटांचे खेळ सध्या सुरू झालेले नाहीत. इंग्रजीतील तीन चित्रपट अगोदरच प्रदर्शित झालेले आहेत. राजधानी पणजी शहरात आणि मडगावात इंग्रजी चित्रपटांचे खेळ सुरू आहेत. राज्यात अन्यत्र मात्र केवळ सुलतानचाच माहौल आहे.
दि. 6 आणि 7 जुलै या दोन दिवसांत राज्यात एकूण 244 खेळ झाले. या सर्व खेळांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अनेक खेळ हाऊसफुल्ल झालेले आहेत, अशी माहिती संबंधित चित्रपटगृह व्यवस्थापनाशी बोलताना मिळाली. सलमानचा चित्रपट म्हटल्यावर ह्यसलमान एके सलमानह्ण असे समीकरण असते. त्याच्या यशासाठीचा सारा मसाला या चित्रपटात ठासून भरला आहे. खूपच गंभीर प्रेक्षकांना तो आवडेलच असे नाही; पण जनता मॉडेल पब्लिकला असे चित्रपट भावतात. सलमानबाबत सध्या हेच घडते आहे. परिणामी सुलतानची आर्थिक घोडदौड वेगाने सुरू आहे. दोन दिवसांत या चित्रपटाने गोव्यात कोटींचा व्यवसाय केला आहे. देशभरातील आकडेवारी हळूहळू झळकेलच!