शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

आई-वडिलांची मुलीसह आत्महत्या

By admin | Updated: August 12, 2014 01:34 IST

भारजुवे : मानसिकदृष्ट्या अपंग असलेल्या एकुलत्या मुलाचे अकाली निधन झाल्याचे दु:ख अनावर होऊन त्याच्या आई-वडिलांनी आपल्या तेरा वर्षांच्या मुलीसह

भारजुवे : मानसिकदृष्ट्या अपंग असलेल्या एकुलत्या मुलाचे अकाली निधन झाल्याचे दु:ख अनावर होऊन त्याच्या आई-वडिलांनी आपल्या तेरा वर्षांच्या मुलीसह गळफास लावून आत्महत्या करण्याची हृदयद्रावक घटना तळपवाडा-कुंभारजुवे (पुलाजवळ) येथे घडली. तिघेही गळफास लावून घरातील पंख्यांना लोंबकळत असलेली स्थानिकांना आढळून आली. कुंभारजुवे परिसरात या घटनेने खळबळ माजली असून हळहळ व्यक्त होत आहे. अशोक नाईक (४६), पत्नी नूतन (४०) व मुलगी दीपश्री (१३) अशी मृतांची नावे आहेत. हा प्रकार सोमवार दि. ११ रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. रविवारी रात्री त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता आहे. सोमवारी सकाळचे ११ वाजले, तरी नाईक यांचे घरातूनच चालविले जाणारे कॅफे नवदुर्गा हे हॉटेल उघडले नसल्याने शेजाऱ्यांनी चौकशी केल्यावर ही घटना उघडकीस आली. बराच वेळ प्रयत्न करूनही आतून प्रतिसाद मिळत नसल्याने दुपारी १ वाजण्याच्या सुमारास शेजाऱ्यांनी जुने गोवे पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी घरात प्रवेश केला, तेव्हा दीपश्री, नूतन व अशोक यांनी घरातील सिलिंग फॅनला दुपट्टा व साडीच्या साहाय्याने गळफास लावून घेतल्याचे आढळून आले. नाईक दाम्पत्याचा मानसिकदृष्ट्या अपंग असलेला मुलगा विशालचे वीस दिवसांपूर्वी निधन झाले होते. तेव्हापासून नाईक कुटुंबीय मानसिक तणावाखाली होते, अशी माहिती घटनास्थळी जमलेल्या लोकांकडून मिळाली. मुलगी दीपश्री ही माशेल येथील शारदा इंग्लिश हायस्कुलात सातवीत शिकत होती. ती अभ्यासात हुशार होती. भावाचे निधन झाल्यामुळे गेल्या महिन्यात झालेल्या परीक्षेला ती अनुपस्थित होती. शिवाय, २२ जुलैपासून ती शाळेत गेली नव्हती, अशी माहिती मिळाली. आई-वडिलांना आलेल्या तीव्र नैराश्यात तिचाही बळी गेला, अशी चर्चा परिसरात सुरू होती. एक उमलती कळी हकनाक जिवास मुकल्याचे दु:खही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. दरम्यान, उपअधीक्षक सेराफिन डायस यांनी जुने गोवे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण सिनारी यांच्यासह घटनास्थळी भेट दिली. उपनिरीक्षक सगुण सावंत तपास करत आहेत. कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर तसेच सरपंच सुरेंद्र नाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. (प्रतिनिधी)