शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

आरक्षणावरून जोरदार असंतोष

By admin | Updated: September 26, 2015 03:26 IST

पणजी/मडगाव : पालिका प्रभाग आरक्षित करताना सरकारने मोठ्या प्रमाणावर घोळ घातल्याने राज्यात मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला आहे.

पणजी/मडगाव : पालिका प्रभाग आरक्षित करताना सरकारने मोठ्या प्रमाणावर घोळ घातल्याने राज्यात मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला आहे. आरक्षणाच्या संपूर्ण प्रक्रियेलाच न्यायालयात आव्हान देण्यासाठी काहीजण तयारी करत आहेत. त्यामुळे ही निवडणूक न्यायालयीन प्रक्रियेत अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनुसूचित जमातीचे कमी केलेले आरक्षण आणि महिलांवरही केलेला अन्याय या दोन मुद्द्यांवर या निवडणूक प्रक्रियेला आव्हान देण्याची तयारी चालू आहे. ‘बायलांचो एकवोट’ संघटनेच्या अध्यक्षा आवदा व्हिएगस यांनी सोमवारी आपण न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले. महिलांना एक तृतीयांशपेक्षा कमी राखीवता असू नये, असे कायद्यात स्पष्ट केलेले असताना सरकारने या गोष्टीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. ‘उटा’ संघटनेचे निमंत्रक गोविंद गावडे यांनीही या आरक्षणाबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. या निर्णयाविरुद्ध न्यायालयात दाद मागता येणे शक्य आहे का यावरही संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये विचार सुरू आहे. मात्र, अजून अंतिम निर्णय झालेला नाही, असे त्यांनी सांगितले. अनुसूचित जमातींना त्यांच्या क्षमतेप्रमाणे आरक्षण द्यावे यासाठी उटाने सरकारकडे यापूर्वीच निवेदन दिले आहे, असे ते म्हणाले. फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनीही या प्रक्रियेला न्यायालयात आव्हान देता येणे शक्य आहे का यावर विचार चालू असल्याचे सांगितले. कित्येक संघटना आणि नागरिक आमच्याकडे आले आहेत. त्यांच्यात असलेली असंतोषाची भावना पाहता या प्रक्रियेला न्यायालयात आव्हान देण्याचीच शक्यता अधिक असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी) (आणखी वृत्त आतील पानांत)