शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
3
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
4
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
5
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
6
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
7
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
8
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
9
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
10
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
11
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
12
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
13
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
14
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
15
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
16
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
17
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
18
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
19
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
20
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार

गोवा फॉरवर्डचा सणसणीत स्ट्राईक रेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2017 02:27 IST

सुशांत कुंकळयेकर ल्ल मडगाव पहिल्यांदाच

सुशांत कुंकळयेकर ल्ल मडगावपहिल्यांदाच निवडणुकीत उतरलेल्या गोवा फॉरवर्डच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले असताना विजय सरदेसाई यांच्या या सेनेने चारपैकी तीन जागा जिंकून सर्वांत अधिक स्ट्राईक रेट असलेला पक्ष म्हणून आपले वर्चस्व निर्विवादपणे स्पष्ट केले. हे करतानाच आपल्याशिवाय कुणालाही सरकार करता येणार नाही, याचीही दक्षताही सरदेसाई यांनी घेतली.या निवडणुकीत गोवा फॉरवर्डतर्फे विजय सरदेसाई यांच्यासह शिवोलीतून विनोद पालयेकर, साळगावातून जयेश साळगावकर तर वेळ्ळीतून अँथनी रॉड्रिग्स असे चार उमेदवार उतरविले होते. त्यापैकी विजय सरदेसाई यांनी आपली जागा राखतानाच विनोद पालयेकर यांनी मंत्री दयानंद मांद्रेकर यांना शिवोलीतून तर जयेश साळगावकर यांनी मंत्री दिलीप परुळेकर यांना साळगावातून अस्मान दाखवित जायंट किलर होण्याची किमया करून दाखविली. विजय सरदेसाई यांच्याविरोधात भाजपने काँग्रेसला हाताला धरून आघाडी उघडलेली असतानाही भाजपचे दामू नाईक यांच्यावर त्यांनी १,३३४ मतांनी विजय मिळविला. शिवोलीत पालयेकर यांनी १0,१८९ मते मिळवित भाजपचे मुरब्बी उमेदवार असलेले दयानंद मांद्रेकर यांच्यावर १,४४१ मतांनी तर जयेश साळगावकर यांनी ९७३५ मते घेताना दिलीप परुळेकर यांच्यावर २१३७ मतांनी विजय मिळविला.या कामगिरीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना सरदेसाई म्हणाले, गोवा फॉरवर्डची घोडदौड अडविण्यासाठी काँग्रेसने भाजपशी छुपी हातमिळवणी करूनही त्यांचा डाव साधला नाही. आम्ही या निवडणुकीत निर्विवादपणे यश मिळविताना गोंय व गोंयकारपणाचा मुद्दा पुढे आणला होता, तो लोकांना पसंत असल्याचे दिसून आले. आता हा पक्ष संपूर्ण गोव्यात विस्तारित करण्यावर आमचा भर असेल. सरकार स्थापनेत गोवा फॉरवर्डची कोणती भूमिका असेल असे विचारले असता, पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीनंतरच यासंंबंधी आम्ही निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले.