शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

खाण अवलंबितांचा पर्वरी सचिवालयावर धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 22:38 IST

खाणी पूर्ववत् सुरु केल्या जाव्यात या मागणीपुष्ठ्यर्थ खाण अवलंबितांनी उद्या गुरुवारी सकाळी ९.३0 वाजता पर्वरी सचिवालयावर मोर्चाचे आयोजन केले आहे.

पणजी : खाणी पूर्ववत् सुरु केल्या जाव्यात या मागणीपुष्ठ्यर्थ खाण अवलंबितांनी उद्या गुरुवारी सकाळी ९.३0 वाजता पर्वरी सचिवालयावर मोर्चाचे आयोजन केले आहे. येथील आझाद मैदानावर जमा होऊन नंतर पर्वरी सचिवालयावर मोर्चा नेला जाईल. 

गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटचे निमंत्रक पुती गांवकर यांनी या मोर्चात खाण कामगार, ट्रकमालक, बार्जवाले तसेच मशिनरीमालक व अन्य मिळून ५ हजार लोक सहभागी होतील, असा दावा केला आहे. मोर्चा शांततापूर्ण मार्गाने असेल, असे त्यांनी सांगितले. गांवकर म्हणाले की, ‘गेल्या वर्षभराच्या खाणबंदीमुळे ३ लाखांहून अधिक अवलंबितांचा उदरनिर्वाह बुडाला. सरकारने खाण व्यवसाय विनाविलंब पूर्ववत् सुरु करायला हवा.’ 

मायनिंग पीपल्स फ्रंटच्या मतें हे सरकार जनताविरोधी आहे की जनतेसाठी आहे हे सिध्द करण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारने नेहमीच खोटी आश्वासने दिली. कायदादुरुस्तीसाठी कोणताही पाठपुरावा केला नाही, असा आरोप आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या २0 जानेवारी रोजी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे राज्य सरकारने कायदेशीर हस्तक्षेप करुन खाणी पूर्ववत् सुरु करण्यासाठी पावले उचलावीत. सरकारने झोपेतून जागे व्हावे आणि खाणी पूर्ववत् सुरु करुन लोकांचा विश्वास संपादन करावा.’

गोवा सुरक्षा मंचकडून पाठिंबा या मोर्चाला गोवा सुरक्षा मंचने पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षाचे प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी असे म्हटले आहे की, ‘राज्यात आणि केंद्रातही भाजपचे सरकार असतानाही खाणबंदीला वर्षभराचा काळ लोटला तरी तोडगा येऊ शकला नाही. सरकारने अवलंबितांची अवहेलना व क्रूर थट्टा चालवली आहे. खाणी पूर्ववत् सुरु करण्याची केवळ आश्वासनेच दिली. प्रत्यक्षात काहीच केले नाही. सरकारने केलेल्या या प्रतारणेबद्दल सरकारवर शक्तिप्रदर्शनानेच दबाव आणून जाब विचारावा लागेल. त्यामुळे आजच्या नियोजित मोर्चात जनतेनेही सहभागी व्हावे.’ 

टॅग्स :goaगोवा