शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
2
विवाहित पुरुषापासून दूर रहा...! कोर्टाचा महिलेला अजब आदेश, स्वत: विवाहित होती, तरी तिला...
3
नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट
4
अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
5
९ महिन्यापूर्वी लव्ह मॅरेज अन् आज फेसबुकवर शेवटचा मेसेज लिहून जोडप्यानं संपवलं आयुष्य
6
शिवानी सोनारने घरी आणली Tata कंपनीची नवी कोरी कार, गाडीची किंमत माहितीये?
7
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
8
दागिन्यांनी मढवलेल्या पत्नीला बुलेटच्या टाकीवर बसवून फिरवलं, पोलिसांनी थेट १६००० हजारांचं चलान कापलं!
9
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
10
नात्यांना काळीमा फासणारी घटना; रेशन कार्ड बनवण्याच्या बहाण्याने घेऊन गेला अन् बायको पोरांना विकून आला!
11
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
12
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
13
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
14
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
15
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
16
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
17
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
18
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
19
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
20
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत

विद्यार्थांकडून वेगवेगळ्या फी'च्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या शैक्षणिक संस्थांवर कडक कारवाई; मुख्यमंत्र्यांचा इशारा

By किशोर कुबल | Updated: May 16, 2024 14:39 IST

विद्यालयांना आम्ही अनुदान स्वरुपात शिक्षकांचा पगार, इमारत भाडे, बालरथाचा खर्च देतो. बालरथाचे देखभाल अनुदान वाढवून आता ५ लाखांवर नेले आहे. या बसगाड्यांची देखभाल करणे शैक्षणिक संस्थांचे काम आहे. बसगाड्यांना फिटनेस न घेतल्यास कारवाई केली जाईल.

किशोर कुबलपणजी : सरकारकडून अनुदान घेऊनही विद्यार्थांकडून वेगवेगळ्या फी च्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या शैक्षणिक संस्थांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिला आहे. पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले कि,‘ असे काही प्रकार आमच्या निदर्शनास आलेले आहेत. लोक तोंडी तक्रारी करतात परंतु लेखी देण्यास घाबरतात. लेखी तक्रार आल्यास कोणाचीही गय न करता कडक कारवाई करण्यात येईल.’मुख्यमंत्री म्हणाले की, ‘पहिलीपासून दहावीपर्यंत कुठलेही पैसे भरावे लागत नाहीत. विद्यालयांना आम्ही अनुदान स्वरुपात शिक्षकांचा पगार, इमारत भाडे, बालरथाचा खर्च देतो. बालरथाचे देखभाल अनुदान वाढवून आता ५ लाखांवर नेले आहे. या बसगाड्यांची देखभाल करणे शैक्षणिक संस्थांचे काम आहे. बसगाड्यांना फिटनेस न घेतल्यास कारवाई केली जाईल.’

यंदा दहावीच्या परीक्षेत राज्यातील ७८ पैकी ४१ माध्यमिक विद्यालयांनी शंभर टक्के निकाल आणला आहे. या विद्यायलांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री म्हणाले की,‘गेल्या पाच वर्षात माझ्या सरकारने विद्यालयांमध्ये पायाभूत सुविधा वाढवल्या. स्मार्ट क्लास रुमण अद्ययावत प्रयोगशाळा, रोबोटिक शिक्षणाची सोय केली. सरकारी विद्यायलांचा दर्जा वाढवला. बढत्या देऊन पूर्णवेळ शिक्षक दिलेले आहेत. पालकांनी सरकारी विद्यायलांकडे दुर्लक्ष करु नये.’

‘शंभर टक्के निकालाचे सुयश प्राप्त केलेल्या सरकारी विद्यालयांचा सत्कार लवकरच केला जाणार आहे. ४१ सरकारी माध्यमिक विद्यालयांनी शंभर टक्के निकाल आणला ही मोठी उपलब्धी आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. गोव्यात बुधवारी दहावीचा निकाल जाहीर झालेला असून ९२.३८ टक्के निकाल लागलेला आहे.