शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्य कर्जाच्या खाईत

By admin | Updated: July 28, 2014 02:20 IST

आर्थिक कसरती : कर्ज पोहोचले ९ हजार कोटींवर

पणजी : राज्य सरकारच्या डोक्यावरील कर्ज ९ हजार कोटींवर पोहोचले आहे. पुढील दोन वर्षात वार्षिक उत्पन्नातील २ हजार ५०० कोटी कर्ज फेडण्यासाठीच तरतूद करावी लागेल. २०१६-१७ मध्ये सातवा वेतन आयोग येणार आहे. कर्मचाऱ्यांना नव्या आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन द्यायचे झाल्यास तो सरकारी तिजोरीवर आणखी ताण येईल. महालेखापालांच्या वित्तीय अहवालातून या गोष्टी उघड झाल्या आहेत. सरकारच्या अर्थसंकल्पापेक्षा कर्जाचे प्रमाण वाढले आहे. खुल्या बाजारातून घेतलेले कर्ज ४ हजार ६२८ कोटींवर पोहोचले आहे. केंद्राकडून घेतलेले कर्ज ९०६ कोटी तर नाबार्ड, हुडको, आयुर्विमा व तत्सम बड्या वित्तीय संस्थांकडून घेतलेले कर्ज ३ हजार ५०० कोटी आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांतच सरकारने रोख्यांद्वारे ३६७ कोटी कर्ज उचलले. आतापर्यंत खुल्या बाजारातून रोख्यांद्वारे उचललेले कर्ज २०१६-१७ या आर्थिक वर्षापासून देय ठरणार आहे. त्यामुळे त्यापुढील चार वर्षे मोठी आव्हानात्मक ठरतील. २०१६-१७ मध्ये २३१२ कोटी बाहेर काढावे लागतील. या वर्षाच्या अर्थसंकल्पावर त्यामुळे मोठा ताण पडण्याची शक्यता आहे. ७५ टक्के मुद्दल ही २०१६ ते २०२० या चार वर्षांच्या काळात सरकारला तिजोरीतून बाहेर काढावी लागेल. गेल्या २७ महिन्यांच्या कालावधीत पर्रीकर सरकारनेच २ हजार ५६८ कोटी रुपये कर्ज काढले आहे. खाणी बंद असल्याने १ हजार कोटींचा रॉयल्टीच्या स्वरूपात येणारा महसूल बुडाला आहे. विशेष म्हणजे २०१६-१७ हे वर्ष विधानसभा निवडणुकीचे असणार आहे. त्यामुळे नवे सरकार डोक्यावर कर्जाचा ‘डोंगर’ घेऊनच येईल, यात शंका नाही. (प्रतिनिधी)