सद्गुरू पाटील ल्ल पणजी मराठीला राजभाषेचे स्थान देण्यासाठी अपक्ष आमदार नरेश सावळ यांनी दुरुस्ती विधेयक आणण्याची पावले उचलून पर्र्वरीचे आमदार रोहन खंवटे व फातोर्र्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनाही आश्चर्याचा मोठा धक्का दिला आहे. नियोजित थर्ड फ्रंटमध्ये राजभाषाप्रश्नी मतभेद असून सावळ यांच्या भूमिकेशी खंवटे व सरदेसाई हे त्यांचे दोन सहकारी आमदार सहमत होणे शक्यच नाही. विधानसभा अधिवेशन येत्या ११ जानेवारी रोजी सुरू होत आहे. गोवा राजभाषा कायद्यात दुरुस्ती सुचविणारे खासगी विधेयक सावळ हे येत्या अधिवेशनात मांडू पाहत आहेत. त्यासाठी त्यांनी विधिमंडळ खात्यास नोटीसही दिली आहे. सर्वच पक्षांच्या आमदारांमध्ये सावळ यांनी खळबळ उडवून दिली आहे. मुख्यमंत्री पार्सेकर, खंवटे, सरदेसाई यांनी आपली मते ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.
राजभाषाप्रश्नी आमदारांत मतभेद
By admin | Updated: December 23, 2015 01:45 IST