शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पाचं कामकाज रोखल्याबद्दल दहा विरोधी आमदारांना सभापतींनी काढलं सभागृहाबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 19:13 IST

अपक्ष आमदार रोहन खंवटे यांच्या अटकेच्या कारवाईवरुन गदारोळ 

पणजी : अपक्ष आमदार रोहन खंवटे यांच्या अटकेच्या विषयावर गोवा विधानसभेत विरोधकांनी अर्थसंकल्पाचे कामकाज रोखण्याचा प्रयत्न केला असता सभापती राजेश पाटणेकर यानी मार्शलकरवी दहाही विरोधी आमदारांना सभागृहाबाहेर काढले. मुख्यमंत्र्यांनी या गदारोळातच अर्थसंकल्पाचे वाचन केले. तत्पूर्वी विरोधकांनी गदारोळ माजविल्याने चारवेळा विधानसभेचे कामकाज तहकूब करावे लागले. 

दुपारी ३ वाजता विधानसभेचे कामकाज सुरु झाले तेव्हा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे अर्थसंकल्प मांडण्यासाठी उभे राहिले असता विरोधी आमदार विजय सरदेसाई, आमदार रोहन खंवटे, आमदार आलेक्स रेजिनाल्द लॉरेन्स, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, आमदार प्रतापसिंह राणे, रवी नाईक, लुइझिन फालेरो, जयेश साळगांवकर, विनोद पालयेंकर व आमदार सुदिन ढवळीकर ‘शेम, शेम’ अशा घोषणा देत सभापतींच्या आसनापर्यंत गेले. तेथे मार्शलनी कडे करुन त्यांना रोखले. गोंधळ घालू नका, अर्थसंकल्पाचे कामकाज सुरळीतपणे चालू द्या असे आवाहन सभापतींनी किमान चारवेळा केले. कामकाज रोखण्याची कृती मागे घ्या अन्यथा एकेका आमदाराचे नाव घेऊन सभागृहाबाहेर काढावे लागेल, अशी ताकीद सभापतींनी दिली परंतु त्यांचे काहीही न ऐकता विरोधकांना जोरजोरात घोषणाबाजी चालूच ठेवली. या गदारोळातही मुख्यमंत्र्यांकडून अर्थसंकल्पाचे वाचन चालू होते. अखेर सात ते आठ मिनिटांनी सभापतींनी मार्शल बोलावून या दहाही आमदारांना सभागृहाबाहेर काढले. खंवटे, रेजिनाल्द यांनी मार्शलना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता ढकलाढकलीही झाली. विरोधकांच्या अनुपस्थितीत प्रथमच मुख्यमंत्र्यांकडून बजेट मांडले गेले. 

चार वेळा कामकाज तहकूबसकाळच्या सत्रात तीनवेळा कामकाज तहकूब करण्यात आले. दुपारी २.३0 वाजता दुसऱ्या सत्रातील कामकाज सुरु झाले तेव्हा ‘शेम, शेम’ अशा घोषणा देत सर्व विरोधी आमदार सभागृहाच्या हौद्यात उतरुन सभापतींच्या आसनापर्यंत गेले. या गदारोळात सभापतींनी माजी आमदार श्रीमती व्हिक्टोरिया फर्नांडिस यांच्या निधनावर शोक व्यक्त करणारा ठराव तसेच आमदार बाबुश मोन्सेरात, आमदार टोनी फर्नांडिस आणि आमदार फ्रान्सिस सिल्वेरा या तिघांनी माजी मुख्यमंत्री तथा पूर्व केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना मरणोत्तर पद्मभूषण दिल्याबद्द्दल अभिनंदनाचा ठराव संमत केला व कामकाज पुन्हा दुपारी ३ पर्यंत तहकूब केले. 

न्याय मिळेपर्यंत कामकाज रोखणार’दरम्यान, ज्या आमदारांना सभागृहाबाहेर काढले त्यात चार माजी मुख्यमंत्री, दोन माजी उपमुख्यमंत्री यांचाही समावेश होता. हा प्रकार लोकशाहीविरोधी असल्याची टीका विरोधी पक्षनेते दिगंबर कामत तसेच त्यांच्या सहकारी विरोधी आमदारांनी नंतर पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले की, ‘गोवा विधानसभा अधिवेशनाच्या इतिहासात प्रथमच अर्थसंकल्पाच्यावेळी विरोधी आमदारांना मार्शल वापरुन सभागृहाबाहेर काढले. खंवटे यांच्याविरुध्दची तक्रार बोगस आहे आणि उलट तक्रारदारावर कारवाई व्हायला हवी, अशी आमची मागणी आहे. उद्या विधानसभेचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे उद्या काय भूमिका असणार आहे, असा प्रश्न केला असता न्याय मिळेपर्यंत आम्ही कामकाज रोखून धरणे चालूच ठेवणार आहोत, असे सरदेसाई यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवाBudgetअर्थसंकल्प