शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

बोलताना काळजी घ्या, मनोहर पर्रीकर यांना निवडणूक आयोगाची समज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2017 20:21 IST

संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भविष्यात, बोलताना अधिक काळजी घ्यावी, अशा शब्दांत केंद्रीय निवडणूक आयोगाने पर्रीकर यांना आज समज

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 16 -  संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भविष्यात, बोलताना अधिक काळजी घ्यावी, अशा शब्दांत केंद्रीय निवडणूक आयोगाने पर्रीकर यांना आज समज दिली. निवडणुकीशी संबंधित लाचखोरी माफ करावी, अशा अप्रत्यक्ष अर्थाचे देखील विधान उच्चपदी असलेल्या कोणीच करू नये. पर्रीकर यांनी केलेले विधान निवडणुकीशी संबंधित अटींचे उल्लंघन ठरते, असे आयोगाने स्पष्ट म्हटले आहे.पर्रीकर यांना यापूर्वी आयोगाने नोटीस पाठवली होती. विधानसभा निवडणुकीवेळी सांताक्रुझ मतदारसंघातील चिंबल येथे भाजपच्या बैठकीवेळी पर्रीकर यांनी काही विधाने केली होती. तुम्ही कोणाकडूनही दोन हजार रुपये घेता व मत देता. तसे करणे ओके आहे. कोणी तरी रॅली काढील. जर कोणी पाचशे रुपये घेऊन फिरत असेल तर आपला आक्षेप नाही, असे पर्रीकर यांनी म्हटले होते, असे निवडणूक आयोगाने गुरुवारी जारी केलेल्या पत्रात स्पष्ट म्हटले आहे. पर्रीकर यांनी आपण अशा अर्थाचे विधान केले नव्हते, आपल्या कोकणी वक्तव्याचा चुकीचा अनुवाद केला गेला, असे म्हटले होते. आम्ही सीडीची सत्यता पडताळून पाहिली. शिवाय कोकणीतील तज्ज्ञांकडून आणि एका तज्ज्ञ समितीकडूनही अनुवाद करून घेतला. सर्वांनी एकच अभिप्राय दिला. म्हणजे अनुवाद व्यवस्थित झाला आहे, असे आयोगाने सांगितले. सर्वच नेते आणि विशेषत: जे उच्चपदी असतात त्यांनी निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्य जपणे गरजेचे असते. अशा प्रकारच्या पावित्र्याला नेत्यांनी प्रोत्साहन द्यायला हवे. उच्चपदी असलेल्या व्यक्तीने निवडणुकीतील लाचखोरी माफ करण्याबाबतच्या अर्थाचे विधान दुरान्वयानेही करणे हा भ्रष्ट व्यवहार ठरतो आणि तो निवडणूकविषयक गुन्हाही ठरतो, असे आयोगाने म्हटले आहे. तसेच पर्रीकर यांचे विधान निवडणूकविषयक अपेक्षा व अटींचे उल्लंघन ठरते. त्यामुळेच भविष्यात अधिक काळजी घ्यावी, असा सल्ला तुम्हाला निवडणूक आयोग देत असल्याचे आयोगाचे सचिव सुमित मुखर्जी यांनी म्हटले आहे. पर्रीकर यांना या पत्राची प्रत आयोगाने पाठवून ते पत्र स्वत:च्या संकेतस्थळावरही जाहीर केले. (खास प्रतिनिधी)