शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणाच्या संतुलनासाठी गोव्यात अत्यग्निष्टोम सोमयाग

By admin | Updated: February 11, 2017 19:28 IST

संपूर्ण मानवजातीच्या, जीवसृष्टीच्या कल्याणासाठी तसेच पर्यावरणाचे संतुलन व्यवस्थित राहावे यासाठी गोव्यातील म्हापसा येथील देव बोडगेश्वर मंदिरासमोर अत्यग्निष्टोम सोमयागाचे आयोजन करण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमत
म्हापसा, दि. 11  : संपूर्ण मानवजातीच्या, जीवसृष्टीच्या कल्याणासाठी तसेच पर्यावरणाचे संतुलन व्यवस्थित राहावे, मानव जातीचे कल्याण व्हावे या हेतूने उत्तर गोव्यातील म्हापसा येथील देव बोडगेश्वर मंदिरासमोर अत्यग्निष्टोम सोमयागाचे आयोजन करण्यात आले आहे. 
 
८ मार्च ते १३ असा सहा दिवस हा सोमयाग होणार असून सहाव्या दिवशी त्याचा समारोप होणार आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना सहभागी होण्यास मिळणा-या या सोमयागाचे २२ वर्षांनंतर गोव्यात आयोजन करण्याचा योग आला असल्याची माहिती बल्लाळ आपटे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. 
 
भारतातील इतर राज्यांत अशा प्रकारच्या यागाचे आयोजन नित्यनेमाने होत असले तरी गोव्यात त्याचे आयोजन होत नसल्याचे आपटे यावेळी म्हणाले. त्याचे आयोजन करणे बरेच कठीण काम असल्याने आयोजन होत नसल्याची माहिती त्यांनी दिली. या यागासाठी सर्व वेदात पारंगत असलेल्या १७ ब्राह्मणांची आवश्यकता असून त्यांना सहकार्य करण्यासाठी १० मदतनीस वापरण्यात येणार आहेत. 
 
सकाळी ८ वाजता सुरू होणारा याग संध्याकाळी ९ वाजेपर्यंत चालू राहणार आहे. सोमवल्ली नावाची वनस्पती यागासाठी वापरण्यात येणार असून हीच वनस्पती यागात वाहिली जाणार आहे. अमेरिकेतील नासा संशोधन केंद्राच्या वतीने अग्निपासून पर्यावरणाला होणारे फायदे मोठ्या प्रमाणात संशोधनही सुरू असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. 
 
दिवसेंदिवस पर्यावरणाची प्रचंड प्रमाणावर हानी होत चालली आहे. वाढत्या प्रदूषणाच्या प्रभावामुळे दिल्लीतील तसेच हरियाणा राज्यातील हायस्कूल्स  काही काळ बंद ठेवावी लागली होती. होणारी ही हानी बिघडलेली ऋतूचक्र व्यवस्थित चालावे व सर्वसामान्य लोकांचे कल्याण व्हावे हा या मागचा मुळ उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
सर्व जाती धर्माच्या लोकांचे कल्याण व्हावे या उद्देशाने यागाचे आयोजन होत असल्याने याग सर्वांसाठी खुला राहणार आहे. मुंबईतील सन्यास आश्रमचे विश्वेश्वरानंद गिरीजी महाराज हे या यागाचे खास वैशिष्ठ असणार आहे.