शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

एल्वीस गोम्सविरुद्ध ठोस पुरावे

By admin | Updated: July 7, 2016 02:39 IST

पणजी : गृहनिर्माण घोटाळा प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे आता तुरुंग महानिरीक्षकपदी असलेले एल्वीस गोम्स

पणजी : गृहनिर्माण घोटाळा प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे आता तुरुंग महानिरीक्षकपदी असलेले एल्वीस गोम्स यांनी म्हटले असले तरी भूसंपादन प्रक्रिया रद्द करण्यासाठी पाठविलेल्या प्रस्तावावर गोम्स यांचीच स्वाक्षरी असल्याचा दावा भ्रष्टाचारविरोधी पथकाने केला आहे. ही स्वाक्षरी फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठविण्यात येणार आहे. गृहनिर्माण मंडळाच्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी मडगाव येथे सुरू असलेली भूसंपादन प्रक्रिया रद्द करण्यासाठी गृहसचिवांना पाठविलेल्या प्रस्तावावर गृहनिर्माण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून गोम्स यांचीच स्वाक्षरी असल्याचे एसीबीचे अधीक्षक विमल गुप्ता यांनी सांगितले. ही स्वाक्षरी फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठविली जाणार असल्याचे ते म्हणाले. माजी पर्यटनमंत्री नीळकंठ हळर्णकर आणि गृहनिर्माण महामंडळाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक एल्वीस गोम्स यांच्या विरुद्ध एसीबीने भूखंड घोटाळ्याचा गुन्हा नोंदविला होता. मडगाव येथे ३०२२६ चौरस मीटर भूखंड गृहनिर्माणासाठी संपादन करीत असल्याचे सांगून ‘सेटलमेंट’ विभागात रूपांतर करून घेऊन नंतर भूसंपादन प्रक्रिया रद्द केली होती. त्यानंतर त्या जमिनीचे व्यावसायिक विभागात रूपांतरण करून तिची विक्रीही केली होती. या प्रकरणात हळर्णकर व गोम्स यांचा प्रत्यक्ष संबंध असल्याचे प्राथमिक तपासात आढळल्यामुळे या प्रकरणात गुन्हा नोंदविला होता. या प्रकरणात आपल्याविरुद्ध गुन्हा नोंदविल्यामुळे गोम्स यांनी तुरुंग महानिरीक्षक पदाचा राजीनामाही सादर केला आहे. आपला या घोटाळ्याशी काहीही संंबंध नसताना आपल्याला त्यात गोवल्याचे तसेच त्या काळात आपण गृहनिर्माण मंडळाचे व्यवस्थापकीय संचालकही नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या दाव्याविषयी एसीबीचे अध्यक्ष गुप्ता यांना विचारले असता त्यांनी ही माहिती दिली. (प्रतिनिधी)