शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सहकारी बँकेत सॉफ्टवेअर घोटाळा: सरदेसाई

By admin | Updated: July 28, 2016 17:50 IST

गोव्याची शिखर बँक असलेल्या गोवा राज्य सहकारी बँकेत १५.५९ कोटींचा डेटा सॉफ्टवेअर कंत्राटात घोटाळा झाल्याचा आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत केला.

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. २८ : गोव्याची शिखर बँक असलेल्या गोवा राज्य सहकारी बँकेत १५.५९ कोटींचा डेटा सॉफ्टवेअर कंत्राटात घोटाळा झाल्याचा आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत केला. मेसर्स इन्फो डायनेमिक सॉफ्टवेअर सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने अगोदर कार्यान्वित करण्यात अलेल्या सॉफ्टवेअरमध्ये दोष असल्याचे आढळून आल्यानंतरही पुन्हा त्याच कंपनीला सॉफ्टवेअरचे कंत्राट देण्यात आले आणि ते बेकायदेशीरपणे देण्यात आल्याचा त्यांचा आरोप होता.

गोवा राज्य सहकारी बँकेच्या पणजी येथील मुख्यालयात सुरू करण्यात आलेल्या डेटा सेंटर प्रकरणात घोटाळा असल्याचा दावा आमदार सरदेसाई आणि इतरांनी केला. ज्या डायनेमिक सॉफ्टवेर सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून या बँकेला सॉफ्टवेअर देण्यात आले होते त्या कंपनीलाच पुन्हा दुसरे कंत्राट देण्यात आले आहे.

कंत्राट देताना कायदेशीर प्रक्रिया पाळली गेली नाही. निविदांसाठी जाहीरात देण्यात आली नाही. केवळ वेबसाईटवर टाकून नंतर चार खाजगी कंपन्यांना बँकेकडून प्रकल्पासाठी प्रस्तावाची पत्रे पाठविण्यात आली. त्यात सॉफ्टेक कॉम्प्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, इन्फो डायनेमिक सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड, नुपूर टेक्नोलोजीस प्रायव्हेट लिमिटेड, वृंदा एन्टरप्रायझीस आणि स्मार्ट इम्फॉर्मेशन सिस्टम या कंपन्याचा समावेश होता.

ठराविक कंपन्यांना प्रस्ताव पाठविण्याच्या कृतीला दिगंबर कामत यांनी आक्षेप घेतला. तसे प्रस्ताव कायद्याने केवळ बँकेशी संलग्न असलेल्याच कंपन्यांना बँक पाठवू शकते. त्या कंपन्या बँकेशी संलग्न नसल्यामुळे बँकेने या कंत्राटासाठी जाहीरात करायला हवी होती. यामुळेच एकंदरीत कारभार हा संशयास्पद वाटत असल्याचे ते म्हणाले.

ज्या कंपन्यांकडून कॉटेशन्स आल्याचे बँकेकडून सांगण्यात आले आहे त्या पैकी एक असलेली सॉफ्टटेक या कंपनीने आपण कोटेशन पाठविलेच नसल्याचे पत्र दिल्याची माहिती सरदासाई यांनी दिली. ते पत्र त्यांनी सभागृहाला सादर केले. या प्रकरणात न्यायालयीन चौकशीची मागणी त्यांनी केली. परंत या प्रकरणात तूर्त खात्याकडून चौकशी केली जाईल अणि त्यात तथ्य आढळून आल्यास नंतर नाबार्डाकडून तपास केला जाईल असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले