शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मडगाव परिसरात सहा घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 02:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमडगाव : धार्मिक स्थळांच्या विटंबना प्रकरणात फ्रान्सिस्को परेरा याला अटक केल्यानंतर गोवा पोलिसांनी काहीसा सुटकेचा नि:श्वास

लोकमत न्यूज नेटवर्कमडगाव : धार्मिक स्थळांच्या विटंबना प्रकरणात फ्रान्सिस्को परेरा याला अटक केल्यानंतर गोवा पोलिसांनी काहीसा सुटकेचा नि:श्वास सोडला होता; मात्र विधानसभा अधिवेशन सुरू झालेले असताना मडगावात तीन कार्यालये व दोन फ्लॅट फोडण्याच्या तसेच नेसाय येथेही एक फ्लॅट फोडण्याची घटना घडल्याने पोलीस पुन्हा एकदा दबावाखाली आले आहेत. नेसाय येथील फ्लॅट व कार्यालयामध्ये चोरांच्या हाती काहीच लागू शकले नाही. या संदर्भात मडगाव पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता, चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात आले.पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास बोर्डा येथील पीडब्ल्यूडी क्वॉर्टर्सजवळ या घटना घडल्या. यापूर्वी याच ठिकाणी चोरांनी सहा फ्लॅट फोडले होते. सोमवारी रात्री चोरी करण्यापूर्वी चोरांनी बाकीच्या सर्व फ्लॅटना बाहेरून कडी लावून ठेवल्याने चोर पळत जात असल्याचे पाहूनही त्यांना बाहेर येऊन अडविणे शक्य झाले नाही.मिळालेल्या माहितीप्रमाणे, सोमवारी रात्री पाऊस पडत होता. त्याचा फायदा घेऊन चोरांनी हा प्रयत्न केला. पीडब्ल्यूडी खात्याची तीन कार्यालये फोडण्याबरोबरच जवळ असलेल्या क्वॉर्टर्समधील एक बंद फ्लॅट फोडण्यात आला; मात्र या कार्यालयात चोरांच्या हाती काहीच लागू शकले नाही, तर दुसऱ्या बंद फ्लॅटमध्येही घरात केवळ कपडेच असल्याने मोठा ऐवज त्यांना मिळाला नाही. याच चोरांनी आणखी एक फ्लॅट फोडण्याचा प्रयत्न केला असता, त्यावेळी झालेल्या आवाजाने जवळच्या फ्लॅटमधील एक महिला जागी झाली. तिने फोनवरून इतरांना सतर्क केले; मात्र बाहेरून कडी घातलेली असल्यामुळे ते बाहेर येऊ शकले नाहीत. लोकांनी फोनवरून पोलिसांशी संपर्क साधला; मात्र पोलीस सायरन वाजवीत घटनास्थळी दाखल झाल्याने त्या आवाजाने सतर्क झालेल्या चोरांनी तेथून पळ काढला. हाफ चड्डीतील एकूण सहाजण धावत असल्याचे लोकांनी पाहिले, अशी माहिती फ्लॅटमधील काहींनी दिली.नेसाय येथेही अशाचप्रकारे एक बंद फ्लॅट फोडण्यात आला; मात्र घरमालक परदेशात असल्याने नेमका किती ऐवज चोरीस गेला, याची माहिती मिळू शकली नाही. मडगावचे पोलीस निरीक्षक सी. एल. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पोलीस घटनास्थळी पोचून १५ मिनिटे उलटली, तरी कोणी बाहेर न आल्याने नेमकी कुठे चोरी झाली, याची माहिती मिळू शकली नाही; मात्र या चोरीत कुठलाही ऐवज चोरीला गेलेला नाही.