शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
2
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
3
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
4
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
5
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
6
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
7
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
8
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
9
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
10
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
11
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
12
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
13
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
14
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
15
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
16
Ganesh Visarjan 2025: बाप्पा दीड दिवसांतच का चालला? असं चिमुकल्यांनी विचारलं, तर द्या 'हे' शास्त्रोक्त उत्तर!
17
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
18
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
19
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
20
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम

सहा आजी-माजी मुख्यमंत्री रिंंगणात

By admin | Updated: January 8, 2017 01:37 IST

पणजी : येत्या विधानसभा निवडणुकीवेळी एकूण सहा आजी-माजी मुख्यमंत्री रिंगणात उतरणार आहेत. १७ वर्षे मुख्यमंत्रिपद

पणजी : येत्या विधानसभा निवडणुकीवेळी एकूण सहा आजी-माजी मुख्यमंत्री रिंगणात उतरणार आहेत. १७ वर्षे मुख्यमंत्रिपद पाहिलेले विद्यमान विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे हे या वेळी दहावी विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. येत्या १८ रोजी ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत. विद्यमान मुख्यमंत्री पार्सेकर हे सहाव्यांदा विधानसभा निवडणुकीस सामोरे जाणार आहेत. यापूर्वीच्या पाच निवडणुकांपैकी ते सलग तीनवेळा मांद्रे मतदारसंघातून जिंकलेले आहेत. भाजपसाठी ही या वेळची पहिली विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक आहे, ज्या निवडणुकीत स्वत: मनोहर पर्रीकर हे उमेदवार म्हणून किंवा मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणूनही रिंगणात नाहीत. ते भाजपचे प्रचाराचे काम पाहतील. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत १९९४ साली भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी काही निवडणुका भाजपच्या, तर काही निवडणुका काँग्रेसच्या तिकिटावर लढवल्या. २०१२ सालच्या निवडणुकीवेळी कामत हे मुख्यमंत्री होते. या वेळी ते आमदार आहेत. ते आताची विधानसभा निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर मडगावमधून लढवणार आहेत. मडगावमध्ये भाजपचा उमेदवार अजून निश्चित झालेला नाही. रवी नाईक हे एकेकाळचे मगोपचे नेते. ९०च्या दशकात काँग्रेसमध्ये गेले. नंतरच्या काळात ते भाजपमध्येही जाऊन आले; पण भाजपच्या चिन्हावर त्यांनी कधी निवडणूक लढविली नाही. २०१२ साली ते फोंडा मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटावर पराभूत झाले. आता पुन्हा रवी नाईक काँग्रेसतर्फे लढतील. त्यांचा सामना मगोप व भाजपशी आहे; पण फोंड्यात अजून भाजपचा उमेदवार निश्चित झालेला नाही. २०१२ साली रवी नाईक यांना मगोप-भाजप युतीविरुद्ध लढावे लागले होते. चर्चिल आलेमाव प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर बाणावलीमधून लढतील. चर्चिल ९०च्या दशकात फक्त १९ दिवस मुख्यमंत्री होते. त्यांनी अनेक पक्ष बदलले. काँग्रेसमध्ये दोनवेळा ते आले व गेले. युगोडेपा, सेव्ह गोवा अशा पक्षांमधूनही ते निवडणुका लढले. २०१२ साली त्यांचा नावेली मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटावर पराभव झाला. लुईझिन फालेरो यांनी निवडणूक लढवणार नाही, असे यापूर्वी वारंवार सांगितले, तरी या वेळी नावेलीमधून निवडणूक लढवतीलच, असे त्यांच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी स्पष्ट केले. २००७ साली पराभूत झाल्यानंतर फालेरो लढले नव्हते. (खास प्रतिनिधी)