शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

श्रीराम सेना कार्यालयाला गोव्यात परवानगी नाही

By admin | Updated: July 31, 2014 02:25 IST

पणजी : गोव्यात प्रमोद मुतालिक यांना श्रीराम सेनेचे कार्यालय उघडण्यास परवानगी देणार नसल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले.

पणजी : गोव्यात प्रमोद मुतालिक यांना श्रीराम सेनेचे कार्यालय उघडण्यास परवानगी देणार नसल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले. आमदार विष्णू वाघ यांच्या अतारांकित प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी हे उत्तर दिले होते; परंतु अशाच स्वरूपाचा आणखी एक प्रश्न आलेक्स रेजिनाल्ड यांनी सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासाला उपस्थित केला. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. रेजिनाल्ड यांचा प्रश्न स्पष्ट होत नव्हता त्यामुळे त्यांनी विचारलेल्या मुतालिक संंबंधी प्रश्नावर वेगळे उत्तर देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले. बिकिनी संस्कृतीविषयी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या संबंधी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी रेजिनाल्ड यांनी केली. त्यावर गोव्यात कुठेही वेशाच्या मुद्द्यावरून कुणाचीही सतावणूक होऊ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होणार नाहीत, याची खबरदारी सर्व मंत्र्यांनी घ्यावीत, अशा सूचना आपण केल्या असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्याचे जबाबदार मंत्री एखादे वक्तव्य करतात आणि ते वैयक्तिक वक्तव्य असल्याचे सांगतात; परंतु यामुळे संसदेपर्यंत हा मुद्दा पोहोचला हे आमदार विजय सरदेसाई यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिले. दीपक ढवळीकर यांनी केलेले हिंदू राष्ट्र संबंधीचे वक्तव्य सभागृहाच्या कामकाजातून वगळण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली; परंतु ती मंजूर करण्यात आली नाही. (प्रतिनिधी)