फोंडा : गेल्या १३ दिवसांपासून सुरू असलेले व मागील तीन-चार दिवसांपासून काहीसे मरगळलेले ट्रकमालकांचे आंदोलन बुधवारी राजकीय नेत्यांच्या सहभागामुळे पुन्हा आक्रमक बनल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेस तसेच अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यामुळे ट्रकमालक संघटनेचा आत्मविश्वास उंचावला असून गुरुवार, दि. १७ रोजी एकाही खनिजवाहू ट्रकास खाणपट्ट्यातून वाहतूक करू न देण्याचा ठाम निर्णय संघटनेने जाहीर केला आहे. त्यामुळे गुरुवारी खाण कंपनीने खनिज वाहतूक सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतल्यास पोलीस बंदोबस्तानंतरही खाणपट्ट्यात राडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सलग दुसऱ्या दिवसी बुधवारी वेदांता खाण कंपनीतर्फे पोलीस बंदोबस्तात खनिज वाहतूक केली. या वेळी उपस्थित असलेल्या सुमारे दोनशे ट्रकमालकांनी सरकार तसेच खाणपट्ट्यातील आमदारांविरोधात घोषणाबाजी केली. विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो, कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, फातोर्डाचे अपक्ष आमदार विजय सरदेसाई, साखळीचे माजी आमदार प्रताप गावस, साखळीचे नगराध्यक्ष धर्मेश सगलानी, काँग्रेसचे प्रवक्ते सुनील कवठणकर आदींनी आंदोलनस्थळी येऊन ट्रकमालक संघटनेला आपला पूर्ण पाठिंबा व्यक्त केला. मात्र, साखळीचे आमदार प्रमोद सावंत आंदोलनापासून अलिप्त राहिल्याचे दिसून आले. बुधवारी दुपारी आंदोलकांची भेट घेतल्यानंतर त्यांना मार्गदर्शन करताना प्रतापसिंग राणे यांनी सरकारच्या खाण अवलंबितांबाबतच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. केंद्र सरकारला गेल्या ५0 वर्षांहून अधिक काळात अब्जावधी रुपयांचे परकीय चलन गोव्यातील खाण व्यवसायाच्या माध्यमातून मिळाले आहे. त्याचा थोडासा तरी वाटा पॅकेजच्या रूपाने गोव्याला मिळण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. व्यवसायात तेजी-मंदी असतेच; मात्र या व्यवसायातील चढ-उतारांचा फटका गरीब घटकांना बसू नये, असेही ते म्हणाले. खाण कंपन्या पोलीस बंदोबस्त मागवून खनिज वाहतूक करत आहेत. मात्र, गोव्यात लोकशाही असल्यामुळे पोलिसांचे राज्य चालणार नाही. ट्रकमालक संघटनेला सदैव आपला पाठिंबा राहणार असून सरकार पातळीवर चर्चेसाठी गरज (पान ४ वर)
आज वाहतूक करूनच दाखवा!
By admin | Updated: December 17, 2015 01:37 IST