शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

म्हापशात रविवारी शिवशौर्य यात्रा; संपूर्ण गोव्यात शिवमय वातावरण

By काशिराम म्हांबरे | Updated: October 5, 2023 15:38 IST

सर्व शिवप्रेमींनी या शिवशौर्य यात्रेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

म्हापसा  -  छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करुन राज्याभिषेक करवून घेतल्यास यंदा ३५० वर्षे पूर्ण होताहेत. हिंदुत्वाचे जनजागरण करण्यासाठी शिवशौर्य यात्रा संपूर्ण गोव्यातून फिरत आहे. सदर यात्रेचे आगमन रविवार दि. ८ ऑक्टोबर रोजी म्हापशात होत असून, सायंकाळी ५ वाज. शहरातून भव्य मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात निघणार आहे. त्यानंतर, टॅक्सी स्टॅण्डवर जाहीर सभेचे आयोजन केले आहे.

या सभेत अखिल भारतीय बजरंग दलाचे संयोजक नीरज दनोरिया हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहतील, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे उत्तर गोवा प्रमुख प्रमोद सांगोडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांच्या समवेत व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा प्रमुख संजय वालावलकर, मंदिर महासंघाचे जयेश थळी, उदय नास्नोडकर, बाबल धारगळकर, प्रशांत परब, सिद्धांत परब, सिद्धांशू साळवी उपस्थित होते.

म्हापसा येथील श्रीदेव बोडगेश्वर मंदिराकडून मिरवणुकीस प्रारंभ  होऊन सवाद्य  शहरातून फेरी निघेल. या शोभा यात्रेत सर्व हिंदू संघटना, मंदिर समितीचे सदस्य, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, स्वराज्य गोमंतक आदी संघटना सहभागी होतील. त्याचप्रमाणे, शिवप्रेमी या शिवशौर्य यात्रेत सहभागी होतील. शोभायात्रेपूर्वी टॅक्सी स्टॅण्डवर शिवरायांच्या ऐतिहासिक प्रसंगांवर आधारित वेशभूषा स्पर्धेचे आयोजन केले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतही जाहीर सभेस उपस्थित राहतील. सर्व शिवप्रेमींनी या शिवशौर्य यात्रेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.