शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

विदेशी जहाजावर काम करणाऱ्या १४५० गोमंतकीय बांधवांना घेऊन मुरगाव बंदरात पोचले जहाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 19:20 IST

कोरोना विषाणूबाबत चाचणी करण्यासाठी जहाजावरच घेण्यात येणार नमूने

वास्को: दोन विदेशी जहाजावर खलाशी म्हणून काम करणाºया १४५० गोमंतकीय बांधवांना घेऊन ‘सेलेब्रेटी इंन्फेनेटी’ जहाज गुरूवारी (दि.१८) सकाळी ११.३० वाजता मुरगाव बंदरात (क्रुज जहाजाच्या धक्यावर) दाखल झाले. यासर्व बांधवांचे कोरोना विषाणूबाबत चाचणी करण्यासाठी जहाजावरच नमूने घेण्यात येणार असून चाचणीचे अहवाल येई पर्यंत ते मुरगाव बंदरात दाखल झालेल्या सदर जहाजातच राहणार असल्याची माहीती मुरगाव पोर्ट ट्रस्ट (एमपीटी) च्या सूत्रांकडून उपलब्ध झाली.

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन केल्यानंतर विविध देशात अडकून राहीलेल्या गोमंतकीय बांधवांना आपल्या राज्यात आणण्याचे काम चालू आहे. मागच्या काही काळात विविध जहाजावर खलाशी म्हणून काम करणाऱ्या तसेच विविध देशात कामाला असलेल्या गोमंतकीय बांधवांना विमान मार्गे, मुंबईहून रस्ता मार्गे अशा विविध प्रकारे आणण्यात आले आहे.

गुरूवारी सकाळी ८.४५ च्या सुमारास ‘सेलेब्रेटी इंन्फेनेटी’ हे जहाज दोन विदेशी जहाजावर खलाशी म्हणून काम करणाºया १४५० गोमंतकीय बांधवांना घेऊन मुरगाव बंदराच्या समुद्र हद्दीत पोचले. मुरगाव बंदरात दाखल झालेले सदर खलाशी बांधव ‘सेलेब्रेटी इंन्फेनेटी’ तसेच ‘एंथम आॅफ द सी’ या जहाजावर काम करणारे कर्मचारी असल्याची माहीती एमपीटी सूत्रांकडून प्राप्त झाली. हे जहाज जरी सकाळी ८.४५ च्या सुमारास मुरगाव बंदराच्या समुद्राच्या हद्दीत पोचले तरी पावसामुळे हवामानात बिघाड झाल्याने जहाज सकाळी १०.३० च्या सुमारास ‘पायलट स्टेशन’ वर पोचले असून नंतर ११.३० च्या सुमारास मुरगाव बंदरात दाखल झाल्याची माहीती सूत्रांनी दिली.

या १४५० गोमंतकीय बांधवांचे कोरोना विषाणूबाबत जहाजावरच चाचणीसाठी नमूने घेण्यात येणार असल्याची माहीती एमपीटी मधील सूत्रांनी देऊन जो पर्यंत त्यांचा अहवाल येत नाही तो पर्यंत त्यांना जहाजावरच ठेवण्यात येणार असल्याची माहीती प्राप्त झाली आहे. सदर बांधवांचा कोरोना विषाणूबाबत अहवाल ‘नेगेटीव्ह’ आल्यानंतर लागू करण्यात आलेल्या ‘एसओपी’ च्या नियमानुसार त्यांना घरी पाठवण्याची पुढची पावले उचलण्यात येणार असल्याची माहीती एमपीटी मधील सूत्रांनी दिली. गुरूवारी सकाळी सदर जहाज मुरगाव बंदरात (एमपीटी) येत असल्याने या जहाजावर असलेल्या बांधवांची कोरोना विषाणूबाबत चाचणी करण्यासाठी तसेच इतर सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलण्यासाठी येथे आरोग्य खात्याचे डॉक्टर तसेच इतर कर्मचारी उपस्थित असल्याची माहीती सूत्रांनी दिली. 

टॅग्स :goaगोवाcorona virusकोरोना वायरस बातम्याSea Routeसागरी महामार्ग