शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर पोलिसांना आश्रय

By admin | Updated: July 31, 2014 02:25 IST

पणजी : एका बाजूने चोरट्यांनी राज्यात धुमाकूळ घातला आहे आणि ज्या चोरट्यांना पकडण्यात आले त्या चोरट्यांकडून जप्त करण्यात आलेले

पणजी : एका बाजूने चोरट्यांनी राज्यात धुमाकूळ घातला आहे आणि ज्या चोरट्यांना पकडण्यात आले त्या चोरट्यांकडून जप्त करण्यात आलेले दागिने ताब्यात घेण्यासाठी पोलीस लोकांकडे लाच मागत आहेत आणि अशा पोलिसांची सरकार पाठराखण करीत असल्याचा आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत केला. प्रश्नोत्तराच्या तासाला अपक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी हा प्रश्न उपस्थित केला. मडगाव येथील सुनिता सुरेंद्र मळकर्णेकर यांच्या घरी मार्च २०१२ मध्ये दागिन्यांची चोरी झाली होती. नंतर चोरट्यांना पोलिसांनी पकडले होते; परंतु पकडण्यात आलेले दागिने ताब्यात देण्यासाठी पोलिसांनी तक्रारदार महिलेकडे पैसे मागितले होते व ते न दिल्यामुळे आजपर्यंत त्यांना दागिने परत केले नसल्याचा आरोप सरदेसाई यांनी सभागृहात केला. तसे नसल्यास या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी त्यांनी केली. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावर समाधान न झाल्यामुळे पोलिसांची कृती बरोबर वाटत असल्यास या प्रकरणात उपनिरीक्षक डायगो ग्रासियस याला निलंबित का करण्यात आले होते, असा प्रश्न सरदेसाई यांनी केला. सभागृहात त्याच्यावर आरोप झाल्यामुळे त्याला निलंबित करण्यात आले होते; परंतु त्याची काहीही चूक नसल्याचे नंतर तपासातून आढळून आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मडगावचे निरीक्षक सुदेश नाईक यांना निलंबित करण्याची सदस्याची मागणी त्यांनी फेटाळली. निरीक्षक नाईक यांनी तक्रारदार महिलेची पैसे मागून सतावणूक चालविल्याची, तसेच हे संपूर्ण प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळल्याचा आरोप केला. (प्रतिनिधी)