शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा-सेना युती होऊ नये हाच हेतू - शरद पवार

By admin | Updated: January 30, 2017 14:13 IST

महाराष्ट्रात भाजपाला समर्थन देण्यासंबंधी केलेले विधान हे भाजपा आणि शिवसेना एकत्र येऊ नयेत, यासाठी खेळलेली रणनीती असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गोव्यात केला आहे.

ऑनलाइन लोकमत

पणजी, दि. 30 - महाराष्ट्रात भाजपाला समर्थन देण्यासंबंधी केलेले विधान हे भाजपा आणि शिवसेना एकत्र येऊ नयेत, यासाठी खेळलेली रणनीती असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गोव्यात केला आहे.  गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले तर भाजपाच्या विरोधात आपले आमदार राहतील, असे विधान पवार यांनी केले. यानंतर त्यांना महाराष्ट्रात भाजपाला सर्थन देण्याचे त्यांचे विधान तत्त्वांशी विसंगत नव्हे काय? असा प्रश्न करण्यात आला होता. त्यावेळी ते म्हणाले की 'महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपा किंवा शिवसेनेशी युती केलेली नाही. 
 
गेली अनेक वर्षे एकत्र निवडणूक लढलेले भाजपा आणि शिवसेना या पक्षांची युती महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तुटली आहे. हे पक्ष पुन्हा एकत्र होऊ नये, यासाठी रणनीतीचा भाग म्हणून भाजपाच्या समर्थनासंबंधी वक्तव्य आपण केले होते. त्यात या पक्षाशी खरोखरच युती करण्याची तयारीही नव्हती आणि इच्छाही नव्हती, असा गौप्यस्फोट पवारांनी केला.  
 
गोवा विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसनं युतीसाठी प्रतिसाद दिला नाही. राष्ट्रवादीला अत्यल्प जागा देण्याच्या पक्षात काँग्रेस होती. येत्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीची शक्ती त्यांना कळणार असल्याचेही पवार म्हणाले. गोव्यात एकला चलो करणाऱ्या राष्ट्रवादीकडून 40 पैकी 17 मतदारसंघात उमेदवार उभे करण्यात आले आहेत. 
 
गोव्यात खनिज उद्योगावर पसरलेली अवकळा आणि त्यामुळे झालेली बेरोजगारी याला संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर हेच जबाबदार आहेत, असा हल्लाबोलही त्यांनी केला. दिल्ली येथील काही पर्यावरणवादी संघटना या गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सांगणे ऐकत होत्या, असा आरोपही पवार यांनी यावेळी केला.